Politics | राजकारण

Jayanta Patil Vs Ajit Pawar : जयंत पाटील यांनी लगावला अजित पवारांना टोला ; वाचा काय म्हणाले

सकाळ डिजिटल टीम

Jayanta Patil Vs Ajit Pawar : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आल्यावर लगेच महाविकास आघाडीच्या काळातील विकासकामांना स्थगिती दिली होती.या विरोधात याचीका दाखल करण्यात आली होती. यावेळी मुंबई हायकोर्टाने सरकारने घातलेल्या निर्णयामुळे सरकारला फटकारले होते. अखेर सरकारने निर्णय बदलला.

आता यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली आहे. यावेळी ट्विट करत ते म्हणले कि, महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय व इतर सर्व विकासकामांना शिंदे फडणवीस सरकारने स्थगिती दिली होती.यामध्ये अगदी गावाच्या छोट्या पाणंद रस्त्यापासून ते राज्य महामार्ग, शासकीय इमारती अशा शेकडो प्रकारच्या महत्त्वाच्या विकासकामांचा समावेश होता.

उच्च न्यायालयाने यापूर्वीच्या याचिकांमध्ये निर्णय देताना राज्य सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. याबद्दल मा. उच्च न्यायालयासमोर उर्वरित प्रलंबित याचिकांमध्ये राज्य सरकारने स्वतःहून सर्व स्थगिती सरसकट उठवली आहे. आम्ही न्यायालयात गेलो नसतो तर राज्य सरकारने ही स्थगिती कधीच उठवली नसती. राज्य सरकारने स्थगिती उठवलेली विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करतील अशी आशा करतो.

लोकांच्या विकासासाठी आम्ही सत्तेत आलो असा कांगावा करणाऱ्यांना ही मोठी चपराक आहे. सत्तेत आल्यानंतर सुरू असलेल्या सर्व कामांना स्थगिती देऊन शिंदे फडणवीस सरकार नक्की कोणाची प्रगती करणार होते? महाविकास आघाडीसाठी मात्र महाराष्ट्राचा विकास हाच ध्यास होता आणि आहे. जय महाराष्ट्र!

अजित पवारांना टोला

अजित पवारांना टोला लगावत जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, लोकांच्या विकासासाठी आम्ही सत्तेत आलो असा कांगावा करणाऱ्यांना ही मोठी चपराक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Charges: किमान बॅलन्सचा फटका!बँकांनी ४ वर्षांत ग्राहकांकडून वसूल केले २६,१७० कोटी; तुमच्याही खात्यातून पैसे कापले?

FDAच्या कारवाईवर न्यायालयाचे ताशेरे, मंत्र्यांच्या हॉटेल्सवर कारवाई केली का? सवाल उपस्थित

Education Crisis: शाळा बुडायची वेळ; पण नाही स्थलांतर! मराठवाडी धरणातील विद्यालयासमोर पेच; २९ वर्षांपासून भिजतेय घोंगडे

Latest Marathi News Live Update : आण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त पुण्यात शनिवारी वाहतुकीत बदल

England Cricket, Test Coach: ब्रेंडन मॅक्युलम OUT? इंग्लंडला मिळणार नवा कोच; CSKशी नातं तोडलेल्या दिग्गजाची एन्ट्री!

SCROLL FOR NEXT