Shivsena Vs Modi : shivsena
Politics | राजकारण

Shivsena Vs Modi : पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात कुलभूषण जाधवांना भारतात आणणार का? उद्धव ठाकरेंचा मोदींना खोचक प्रश्न

Shivsena Vs Modi :

सकाळ डिजिटल टीम

Shivsena Vs Modi : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय सैनिक कुलभूषण जाधव यांना तुम्ही भारत - पाकिस्तान क्रिकेट सामन्यावेळी अहमदाबाद मध्ये आणणार आहात का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी हिंगोली येथील सभेत भारतीय जनता पक्षाला विचारला.

हिंगोली येथे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. या सभेवेळी उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर आणि त्यांच्या मित्र पक्षावर चांगलाच घणाघात केला.

यावेळी ते म्हणाले की ,भारतीय जनता पक्ष नेहमीच हिंदुत्व विषयी बोलतो. आम्ही हिंदुत्ववादी आहोत अशा घोषणा देतो. तर हिंदुस्तान पाकिस्तान सामना तुमच्या आमदाबादच्या मैदानावर होणार आहे हे तुमचं हिंदुत्व आहे का? पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय सैनिक कुलभूषण जाधव यांना तुम्ही भारत - पाकिस्तान क्रिकेट सामन्यावेळी अहमदाबाद मध्ये आणणार आहात का?

याचबरोबर ज्या दिवशी माझे लोक मला म्हणतील की 'उद्धव तू घरी बस' त्या दिवशी मी घरी बसेल. तुम्ही घराणेशाही विरुद्ध बोलता मात्र तुम्हाला माझा बाप चोरावा लागतो असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

तुम्हाला माझ्या वडिलांचे नाव घेऊन मतं मागावे लागतात. तुम्ही नेतेही आमचे चोरता आणि वडीलही. तुमच्या दिल्लीच्या वडिलांमध्ये मत मागायची हिम्मत राहिली नाही का? असा सवाल यावेळी त्यांनी केला.

तुमच्या विरोधात जे बोलतील ते देशद्रोही, दहशतवादी, अतिरेकी आहेत .तर माझ्यासमोर आलेले. माझ्या प्रेमाखातर आलेले हे सर्व लोक अतिरेकी आहेत का? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी विचारला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT