36 days series sakal
Premier

36 days series : रहस्यमयी खुनाचा उलटा प्रवास

36 days series : ‘36 डेज’ सीरिजमध्ये खुनाच्या घटनेच्या 36 दिवसांपूर्वीच्या घटनांचा रोचक प्रवास.

सकाळ वृत्तसेवा

36 days series : सहसा रहस्य कथेमध्ये एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याचा तपास सुरू होतो. तपास यंत्रणेसमोर अनेक संशयित आरोपी असतात. गुन्हा करण्यासाठी प्रत्येकाकडे वेगळं कारण असतं. या आरोपींमधून खरा गुन्हेगार शोधून काढण्याची प्रक्रिया  कथानकाला रोचक बनवते. प्रेक्षकही आपापल्या तर्काने गुन्हेगार कोण असेल याचा अंदाज घेत असतात. 

ही उत्सुकता टिकवून ठेवणे हे एक मोठं आव्हान असतं. ‘३६ डेज’ या  ‘सोनी लिव’ वरील सीरिजमध्ये मात्र सुरुवातीलाच खुनाची घटना घडते आणि त्या घटनेच्या ३६ दिवस अगोदर काय काय घडलं, याचा प्रवास दाखवला जातो. विशेष म्हणजे या खुनाचा तपास करणारी कोणतीही यंत्रणा इथे  दाखवण्यात आलेली  नाही.  त्यामुळे प्रेक्षकच एक प्रकारे या ३६ दिवसांच्या प्रवासात घडणारा घटनाक्रम पाहून खुन्यापर्यंत पोहोचतात.

गोवा येथील एका उच्चभ्रू सोसायटीत कथानक घडते.  पाच आलिशान  बंगल्यांच्या या सोसायटीतील एका बंगल्यात  एक तरुणी राहण्यास येते,  हवाई सुंदरी म्हणून काम करणारी फरहा (नेहा शर्मा) सोसायटीत सर्वांच्या चर्चेचा विषय बनते.  स्थानिक माफिया नोएलचा  (केसी शंकर)  भागीदार  टोनी (चंदन रॉय संन्याल)  फरहावर नजर ठेवून असतो.

त्यामुळे घाबरलेली फरहा शेजारी राहणाऱ्या  ऋषीला (पूरब कोहली) याची माहिती देऊन त्याची मदत मागते.  नोएलच्या कॅसिनोचा मॅनेजर विनोदचा (शारिब हाश्मी) फरहावर संशय असतो, कारण तिच्या येण्याच्या दिवशीच त्याच्या घरी पोलिसांची धाड पडते.  फरहा नक्की कोण असते आणि तिच्या येण्याने सोसायटीत ज्या विचित्र घटनांची मालिका घडते, त्यामुळे येथे राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात कोणतं वादळ येतं, याची कथा सीरिजच्या आठ भागांत दाखवली जाते.

१० वर्षांपूर्वी ‘३५ डेज’ या नावाने प्रदर्शित झालेल्या पाश्चात्य वेबसीरिजचा हा अधिकृत भारतीय रिमेक आहे. अनाहता मेनन आणि सेनेका मेनडॉनसा यांनी सीरिजचं लेखन केलं आहे.  दिग्दर्शन  विशाल फुरीया यांचं आहे.  कथेत व्यक्तिरेखांची प्रचंड गर्दी आहे. शिवाय प्रत्येक व्यक्तिरेखेचं थोडंबहुत उपकथानक आहे,  परंतु पटकथेत या सर्वांचा  ताळमेळ बसवण्यात लेखकांची दमछाक झाली आहे.  या सर्व व्यक्तिरेखांची कथानके लक्षात  ठेवणे प्रेक्षकांसाठीही जिकरीचे बनले आहे. 

काही व्यक्तिरेखा कथानकात अनावश्यक वाटतात, तर काही महत्त्वाच्या प्रसंगांत केवळ आपली हजेरी लावून जातात. उदाहरणार्थ बोबो  (शिवम पाटील) आणि क्लिओ (श्वेता मेहता) यांचं प्रेम प्रकरण दाखवण्याचं प्रयोजन कळत नाही. विनोद आणि त्याची पत्नी ललिता (अमृता खानविलकर) यांच्यातील बेबनाव, डेंजेलचं  (केनेथ देसाई)  हनीट्रॅपमध्ये अडकणं, बेनेफर (शरनाज पटेल) आणि रियाद (फैसल रशीद) यांचे  मानसिक आजार,  सियाचा  (चाहत  विज) चित्रपटसृष्टीतील प्रवास असे अनेक प्रसंग वरवरचे वाटतात. 

ऋषी आणि त्याची पत्नी राधिका (श्रुती सेठ) यांच्यातील कौटुंबिक तणाव अधिक गंभीरपणे दाखवण्याची गरज होती. अभिनयात नेहा शर्माची कामगिरी निराशाजनक आहे. महत्त्वाची भूमिका असूनही त्या व्यक्तिरेखेची लय तिला सापडलेली नाही.  तापट आणि स्त्रीलंपट टोनी चंदन रॉय संन्यालने प्रभावीपणे साकारला आहे. विनोदच्या भूमिकेत शारिब हाश्मीही लक्षात राहतो; परंतु ताराच्या भूमिकेतील सुशांत दिवगीकरने सीरिजमध्ये धमाल आणली आहे.

टोनी आणि त्याची जुगलबंदी असलेले प्रसंग प्रेक्षणीय झाले आहेत.  अर्थात लेखकांनी त्याच्या व्यक्तिरेखेचा एकूण प्रवास  तपशीलवार लिहिला आहे.  सीरिजचा आवाका बघता मेकअप आणि ॲक्शन दृश्ये  या विभागांची कामगिरी  निराशाजनक आहे. पाश्चात्य सीरिजचं भारतीयीकरण करण्यात बऱ्याच वेळा लेखक गोंधळात पडतात. कथेचा अस्सल बाज कायम ठेवून  भारतीय पार्श्वभूमीसोबत सुसंगत करणे ही क्लिष्ट प्रक्रिया आहे. ‘३६ डेज’ या प्रक्रियेत फसलेली वाटते आणि त्यामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात कमी पडते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात कारमध्ये प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे, नको त्या अवस्थेत सापडले; तरुणी लहान असल्यानं पोलिसांनी ताकीद देत सोडलं, VIDEO VIRAL

Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Latest Marathi Breaking News Live Update : पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या रेस्टॉरंट अँड बार मध्ये दरोडा

Aadhar Card Updates : आधारकार्ड मध्ये होणार मोठा बदल! नवीन आधार असणार अधिक सुरक्षित! जाणून घ्या काय होणार बदल

विदर्भातही बिबट्याची दहशत! नागपुरातील भांडेवाडी परिसरात वावर, वनविभागाचं पथक दाखल

SCROLL FOR NEXT