Amruta Khanvilkar sakal
Premier

Amruta Khanvilkar: मराठमोळी अमृता खानविलकर झळकणार हिंदी वेब सीरिजमध्ये; '36 डे ' चा ट्रेलर पाहिलात का?

36 Days Trailer: वर्षाच्या सुरुवातीला अमृता लुटेरे, चाचा विधायक है हमारे-3 मध्ये दिसली होती आणि आता ती "36 डे" मध्ये झळकणार आहे.

priyanka kulkarni

Amruta Khanvilkar: मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार नवनवीन बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये दिसत आहेत. त्यात अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हीच नाव आपसूक येतच. अमृता 2024 या वर्षात अनेक बॉलिवुड प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याचा चर्चा होत असताना ती पुन्हा एकदा सोनी लिव्ह च्या 36 डे या नव्या वेब शो मधून दिसणार आहे. कायम वेगळ्या भूमिका साकारणारी अमृता या प्रोजेक्ट मध्ये नक्कीच वेगळी भूमिका साकारणार असल्याचं कळतंय.

वर्षाच्या सुरुवातीला अमृता लुटेरे, चाचा विधायक है हमारे-3 मध्ये दिसली होती आणि आता ती "36 डे" मध्ये झळकणार आहे. अमृताने सोशल मीडिया वर पोस्ट शेयर करून ही खास बातमी प्रेक्षकांना दिली आहे. 36 डे मध्ये शारिब हाश्मी, नेहा शर्मा यांच्यासोबतीने अनेक कलाकार दिसणार आहेत.

अमृता नव्या प्रोजेक्ट बद्दल बोलताना म्हणते "एका हिंदी प्रोजेक्ट मध्ये पहिल्यांदा मी मराठी मुलीचं पात्र साकारत आहे आणि ही भूमिका नेहमीच्या भूमिका पेक्षा नक्कीच वेगळी आहे. विशाल फुरिया हा माझा चांगला मित्र आहे आणि त्याचा सोबत ही वेब सीरिज करायला मिळणं हा एक खास योग या निमित्ताने जुळून आला. 30 ते 40 दिवस गोव्यात शूट केलेली ही वेब सीरिज माझ्यासाठी खूप कमालीचा अनुभव होता सोबतीला शारीब हाश्मी सारख्या कलाकाराच्या सोबत एवढ्या जवळून काम करायला मिळाल. 36 डे मध्ये शारिब ची भूमिका आणि माझी भूमिका विरुद्ध बाजूला आहे आणि ही दोन पात्र विचारांच्या बाहेरची आहेत."

पाहा ट्रेलर:

अमृताचे आगामी प्रोजेक्ट

अमृता आगामी काळात "कलावती', 'ललिता बाबर', 'पठ्ठे बापूराव' यामधून प्रेक्षकांच्या भेटीला देखील येणार आहे. सोशल मीडियावर अमृताच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अमृता कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते आणि तिच्या नवनवीन प्रोजेक्ट्स ची माहिती ती प्रेक्षकांना देत असते. आता 36 डे नक्की काय असणार? अमृताची कशी भूमिका साकारणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT