athiya and rahul  sakal
Premier

Athiya-Rahul: आथिया शेट्टी- के एल राहुल बनले आमिर खानचे शेजारी; खरेदी केला कोट्यवधींचा फ्लॅट, पॉश एरियामधील घराची किंमत किती

Athiya Rahul Buy New Apartment: अथिया शेट्टी आणि के एल राहुल यांनी नुकताच एक आलिशान फ्लॅट घेतला आहे. ते आता आमिर खानचे शेजारी झाले आहेत.

Payal Naik

अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी हिने पती आणि क्रिकेटर के एल राहुल याच्यासोबत मिळून मुंबईतील पॉश एरियामध्ये महागडा फ्लॅट खरेदी केला आहे. त्यांनी मुंबईतील बांद्रा येथील पाली हिल्स येथे एक शानदान अपार्टमेंट घेतलं आहे. हा मुंबईतील सगळ्यात पॉश एरियापैकी एक आहे. या भागात अनेक बॉलिवूड कलाकारांची घरं आहेत. आमिर खान याचंही घर याच भागात आहेत. आता अथिया आणि राहुल त्याचे शेजारी झाले आहेत. हे घर ३ हजार ३५० स्वेअर फूटचं आहे. संधू पॅलेस येथे दुसऱ्या मजल्यावर हा फ्लॅट आहे. या बिल्डिंगमध्ये एकूण १८ फ्लोअर आहेत. या घराची किंमत किती आहे?

IndexTap.com द्वारे प्रवेश केलेल्या मालमत्तेच्या नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, इमारतीला बीएमसीकडून आंशिक व्यवसाय प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी या अपार्टमेंटसाठी 1.20 कोटी रुपये मुद्रांक शुल्क आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क भरलं आहे. या इमारतीत चार पार्किंग आहेत. 15 जुलै रोजी मालमत्तेची नोंदणी झाल्याचं सांगण्यात येत आहे. या अपार्टमेंटची किंमत 20 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

पाली हिल परिसर हा मुंबईचा अतिशय पॉश एरिया आहे आणि अनेक बॉलिवूड स्टार्स येथे राहतात. दिलीप कुमार आणि आमिर खान सारख्या सेलिब्रिटींच्या बंगल्याचा पुनर्विकास होत आहे. याशिवाय सलमान खान, शाहरुख खान, सैफ अली खान, जान्हवी कपूर आणि तृप्ती डिमरी हे देखील पाली हिल परिसरात राहतात.

अथिया आणि केएल राहुल यांच्या नेट वर्थ

अथिया आणि केएल राहुल यांच्या नेट वर्थ आणि महागड्या गोष्टींबद्दल बोलायचं तर, दोघांची संपत्ती 130 कोटी रुपये आहे. त्यांचं मुंबईत आलिशान घर आहे. याशिवाय, त्याच्याकडे बेंगळुरूमध्ये कोट्यवधी रुपयांचं घर आणि अनेक आलिशान कार आहेत, ज्यात लॅम्बोर्गिनी हुरॅकन स्पायडर आणि ॲस्टन मार्टिन डीबी 11 यांचा समावेश आहे. त्यांची किंमत करोडोंमध्ये आहे. केएल राहुलप्रमाणेच अथियाकडेही अनेक लक्झरी कार आहेत, ज्यात मर्सिडीज बेंझ एस क्लासचा समावेश आहे. त्याची किंमत 1.77 ते 1.86 कोटी रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांच्या थेट डोक्याला लावली बंदूक, Z+ सुरक्षा असतानाही घटना; २० वर्षांपासून रचत होता कट

Latest Marathi News Live Update : देशभरात गॅस सिलिंडर टंचाईमुळे लोकांची धावाधाव सुरूच

Farooq Abdullah Attack : फारूख अब्दुल्लांवर हल्ला करणारा कमल सिंग कोण आहे, कशामुळे झाडली गोळी ? सांगितले धक्कादायक कारण

Beed RTE Admission, Fake Rent Agreements: आरटीई प्रवेशासाठी बनावट भाडेकरार? बीडमध्ये शाळेजवळ ‘पत्ता’ मिळवण्याची स्पर्धा

Kolhapur Gas Cylinder Shortage : कोल्हापुरात सिलिंडरसाठी रांगा, नागरिकांचे उन्हातान्हात प्रचंड हाल; प्रशासनाची भूमिका काय?

SCROLL FOR NEXT