abhijit kelkar esakal
Premier

दोन तासापासून घोडबंदरच्या ट्राफिकमध्ये अडकलाय अभिनेता; वैतागून म्हणाला- एखाद्या ट्रॉलरच्या खाली माझा मृत्यू झाला तर...

Marathi Actor Angry Post On Ghodbunder Traffic : लोकप्रिय अभिनेत्याने आता घोडबंदर रोडवरील ट्राफिकला वैतागून एक पोस्ट केली आहे. तो गेले कित्येक तास ट्राफिकमध्ये अडकला आहे.

Payal Naik

ठाण्यात ट्राफिकची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढणारी गर्दी आणि त्यामुळे वाढणारं ट्राफिक ही आता रोजचीच अडचण झाली आहे. त्यातही ठाण्यातील घोडबंदर रोड येथील वाहतूककोंडी हीदेखील दररोजची समस्या झाली आहे. मोठमोठाले खड्डे आणि जड मालाची वाहतूक करणारे ट्रक यामुळे तिथे प्रचंड वाहतूक कोंडी होते. याबद्दल आतापर्यंत अनेक कलाकारांनी रोष व्यक्त केलाय. सर्वसामान्य व्यक्तींसोबत कलाकारांनादेखील या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका बसताना दिसतो. अनेक कलाकार हे घोडबंदर रोडहुन बोरिवलीला शूटिंगसाठी ये जा करत असतात. आताही एका मराठी कलाकाराने या वाहतूक कोंडीला कंटाळून एक पोस्ट केली आहे.

'बिग बॉस मराठी' फेम अभिजित केळकर याने एक पोस्ट करत आपण सकाळी साडेसात वाजल्यापासून एका जागीच अडकलो असल्याचं सांगितलं आहे. त्याने पोस्ट करत लिहिलं, 'आज शूटिंगचा साडेआठ चा कॉल टाईम होता साडेसात वाजता घरून गुगल मॅप बघून निघालेला मी गेल्या दीड तास घोडबंदर रोडवरच्या घाटाच्या ही बराच आधी असलेल्या शेल पेट्रोल पंप च्या इकडे बंपर टू बंपर ट्रॅफिक मध्ये अडकलो आहे, ट्राफिक कधी सुटणार शूटिंगला आपण कधी पोहोचू शकणार हे माहित नाही, ह्या केऑटिक सिच्युएशन मध्ये घाणेरड्या रस्त्यांमुळे आणि बेशिस्त ट्रक ड्रायव्हर्स मुळे, एखादा ट्रक किंवा ट्रॉलर उलटून त्याच्या खाली माझा मृत्यू झालाच आणि माझ्या पश्चात त्या स्पॉटला माझं नाव द्यायचा विचार चुकून मागून झालाच तर माझा उल्लेख अभिनेता अभिजीत केळकर असा न करता अभिजीत केळकर असा करावा ही विनंती...''

त्याच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी त्यांचं मत मांडलं आहे. आम्हालाही या सगळ्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय आणि सरकार याबद्दल कोणतीही ठोस पाऊलं उचलताना दिसत नाही असं त्यांनी म्हंटलं आहे. यापूर्वी अपूर्वा नेमळेकरने देखील याबद्दल आवाज उठवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : भारत अन् श्रीलंकेत संरक्षण क्षेत्रातील तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Pune News : नैरोबीच्या महिलेला मिळाले पुण्‍यात जीवदान! अकरा शस्त्रक्रिया, अन्‌ परदेशी महिलेची मृत्यूशी झुंज यशस्‍वी

SCROLL FOR NEXT