Shahrukh and Abram are fighting 
Premier

Shahrukh Khan : शाहरुखवर अबराम भडकला ; सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत

Abram and Shahrukh latest video went viral on social media : अभिनेता शाहरुख खानचा धाकटा लेक त्याच्यावर भडकला. काय होतं कारण जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता शाहरुख खानने त्याच्या अभिनयाच्या जोरावर कित्येक दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. यासोबतच सोशल मीडियावरील त्याचे बरेच व्हिडीओज चर्चेत असतात. त्याची प्रेरणादायी वाक्य असो किंवा त्याच्या मुलांसोबतचे सुंदर क्षण असलेले रील्स पाहणं प्रेक्षक एन्जॉय करतात. सोशल मीडियावर सध्या शाहरुखचा आयपीएल मॅच दरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. नुकतीच शाहरुख खानच्या मालकीची टीम असलेल्या कोलकता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या क्रिकेट सामना पार पडला. या मॅचला शाहरुखसोबत त्याचा धाकटा लेक अबरामने सुद्धा हजेरी लावली होती. यावेळी अबरामच्या क्युट वागणुकीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

काय आहे या व्हिडिओमध्ये?

या व्हिडिओमध्ये शाहरुख आणि अबराम त्यांची टीम कोलकाता नाईट रायडर्सला स्टेडियममध्ये उपस्थित राहून सपोर्ट करताना दिसत आहेत. यावेळी शाहरुख आणि अबरामचा एक व्हिडीओ चाहत्यांनी रेकॉर्ड केला. या व्हिडिओमध्ये शाहरुख आणि अबराममध्ये मस्ती सुरु असल्याचं दिसून येतंय. शाहरुख अबरामला चिडवत होता आणि त्याने मस्तीमध्ये त्याचा गळा पकडला. त्याचं हे वागणं अबरामला आवडलं नाही. त्याने शाहरुखचा हात झटकला आणि त्याच्यावर डोळे मोठे करून ओरडला. अबराम आणि शाहरुखच्या या बॉण्डचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

पहा व्हिडीओ:

सोशल मीडियावर अबराम आणि शाहरुखचा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं. अबराम हा पहिल्यापासूनच शाहरुखच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. त्याचे व्हिडीओज कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतात. मॅचपूर्वी शाहरुख आणि अबरामचा मैदानात फेरफटका मारतानाचा आणि चाहत्यांशी संवाद साधतानाचा व्हिडीओ पण व्हायरल झाला होता.

या आधीही या बापलेकाच्या जोडीचे अनेक व्हिडीओज व्हायरल झाले आहेत. लहानग्या अबरामला शाहरुखच्या चाहत्यांना भेटणं खूप आवडतं. शाहरुख जेव्हा जेव्हा त्याच्या 'मन्नत' बंगल्याबाहेर उभं राहणाऱ्या चाहत्यांची भेट घेतो तेव्हा अबरामही त्याच्या बरोबर हजर असतो. "अबरामला माझ्या चाहत्यांना भेटणं खूप आवडतं" असं शाहरुखने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satyapal Malik Death Cause: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन; 'या' गंभीर आजाराने होते ग्रस्त, नेमकं काय घडलं?

Amit Shah Record: अमित शहांनी नोंदवला सर्वाधिक काळ गृहमंत्री पदावर राहण्याचा विक्रम!

Latest Maharashtra News Updates Live : वांगणी रेल्वे फाटक रस्त्याची दुरवस्था, खड्ड्यामुळे वाहन चालवणंही कठीण

Video : पाठीमागून गपचूप आला मिठी मारली अन् छातीवर...; रस्त्यावर महिलेसोबत अश्लील कृत्य, धक्कादायक घटनेचे फुटेज व्हायरल, पाहा व्हिडीओ

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत ढगफुटीमुळे पूर, मलब्याने घरे उद्ध्वस्त! अनेक लोक अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू...

SCROLL FOR NEXT