Abhay Deol Esakal
Premier

Abhay Deol Controversial Statement: "आयुष्यात सगळे अनुभव.."अभय देओलचा लैंगिकते बद्दल मोठा खुलासा, फोटो शेअर करत केला म्हणाला-

Abhay Deol Controversial Statement About His Sexuality: अभिनेता अभय देओलने त्याच्या लैंगिकतेविषयी वादग्रस्त भाष्य केलं. काय म्हणाला अभय जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता अभय देओल कायमच त्याच्या हटके भूमिकांसाठी ओळखला जातो. त्याचे काका आणि भावंडं एकीकडे पूर्णपणे बॉलिवूडच्या वर्षानुवर्षे चालणाऱ्या पठडीतील भूमिकांसाठी प्रसिद्ध असताना अभयने मात्र 'ओए लक्की लक्की ओए','देव डी' अशा सिनेमांमध्ये काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण यावेळी अभयने त्याच्या लैंगिकतेबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आला आहे.

लैंगिकतेवर अभय म्हणाला...

अभयने नुकतीच द डर्टी मॅगझीनला त्याच्या आगामी सिनेमानिमित्त मुलाखत दिली. यावेळी त्याने विविध विषयांवर गप्पा मारल्या आणि त्यांच्या लैंगिकतेविषयी भाष्य केलं.तो म्हणाला, "लैंगिकतेच पाश्चिमात्य पद्धतीने केलेलं वर्गीकरण मला मान्य नाही. ती खूपच ब्लॅक आणि व्हाईट आहे. पूर्वेकडच्या देशांचा दृष्टिकोन याबाबत वेगळा आहे आणि तो आपल्या सगळ्यांना स्वीकारतो. मी माझ्या लैंगिकतेची व्याख्या सांगू शकत नाही कारण ते वादग्रस्त ठरू शकत. ही एक अशी गोष्ट आहे जी सांगू शकत नाही. मला वाटत ही अशी गोष्ट आहे जी समोरच्याला अधिक फायदेशीर आहे म्हणजे तो समोरच्याला एका साचेबद्ध चौकटीत बसवू शकेल. मला स्वतःला पाश्चिमात्य लैगिकतेच्या चौकटीत बसावं अस वाटत नाही. मी आयुष्यात सगळ्या प्रकारचे अनुभव घेतले आहेत आणि असे अनुभव घेणं मी सुरू ठेवेन.मला नाही माहीत याला काय नाव दिलं पाहिजे पण मला कोणतंच नाव द्यायचं नाहीये. आपल्या सगळ्यांमध्ये पुरुष आणि स्त्रीचे गुण असतात त्यामुळे मला वाटतं आपण सगळेही तेच आहोत."

इथे घालवतो रिकामा वेळ..

गेला बराच काळ अभय सिनेविश्वापासून दूर होता याविषयी सांगताना त्याने सांगितलं की, तो जास्तीत जास्त वेळ त्याच्या गोव्यामध्ये असलेल्या घरी घालवतो किंवा तो लॉस एंजलीस मध्ये राहतो. कारण तिथे तो सगळ्यांसाठी अनोळखी आहे.

आगामी प्रोजेक्ट

अभयचा आता 'बन टिक्की' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात अभय बरोबर शबाना आझमी आणि झीनत अमान यांच्या मुख्य भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT