Jolly LLB 3 Esakal
Premier

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

Akshay Kumar : अभिनेता अक्षय कुमारने जॉली एलएलबी 3चं शूटिंग पूर्ण करताच राजस्थानच्या गावामधील मुलींची मदत करण्यासाठी ठोस पाऊल उचललं.

सकाळ डिजिटल टीम

अर्शद वारसी आणि अक्षय कुमार लवकरच 'जॉली एलएलबी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. 'जॉली एलएलबी' फ्रँचायजीचा हा तिसरा धमाल सिनेमा आहे. एक वेगळी कथा पुन्हा एकदा प्रेक्षकांना या सिनेमाद्वारे पाहायला मिळणार आहे.

या सिनेमाच्या शुटिंगबाबत एक नवीन अपडेट अभिनेता अक्षय कुमारने शेअर केली. अक्षयनं पोस्ट शेअर करून राजस्थान शेड्यूलचे शूटिंग संपलं असल्याचं त्याने जाहीर केलं.

सोशल मीडियावर अक्षय आणि अर्शदचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडिओत ते दोघेही रक्तानं भिजलेल्या अवस्थेत दुचाकीवरून जाताना दिसत आहेत.अक्षयने पोस्ट केलेला हा व्हिडीओ आणि त्याच्या अपडेटची सध्या सगळीकडे चर्चा असतानाच त्याने केलेल्या आणखी एका घोषणेमुळे सगळीकडे त्याचं कौतुक होतंय.

अक्षयकुमार 500 मुलींना करणार मदत

जयनगरजवळील देवमाली मसुदा या गावात 'जॉली एलएलबी 3'च्या शूटिंगसाठी आलेल्या अक्षय कुमारनं गावातील 500 मुलींच्या सुकन्या समृद्धी खात्यात पैसे जमा करण्याची घोषणा केलीये. 0 ते 10 वर्षे वयोगटातील मुलींसाठी खाते उघडले जाईल. प्रत्येक मुलीच्या खात्यात एकदा 1000 रुपये जमा केले जातील.

'जॉली एलएलबी 3' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अक्षयनं ही घोषणा केली. यावेळी अक्षयने जाहीर केलं की, "गावात मुलींच्या शिक्षणाचा अभाव आहे. यावेळी मुलींना शिक्षित करण्यात यावे." 'जॉली एलएलबी 3'च्या शूटिंगसाठी गावात आलेल्या अक्षय कुमारचे देवमाळीच्या ग्रामस्थांनी स्वागत केलं होतं.

 अक्षय आणि अर्शदचे आगामी प्रोजेक्ट्स

'जॉली एलएलबी' फ्रँचायझीमधील पहिला भाग हा 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये अर्शदच्या भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट अनेकांना आवडला होता. यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग 2017 मध्ये रिलीज झाला होता. यात अक्षय हा जॉली नावाच्या वकीलाच्या भूमिकेत दिसला होता. दरम्यान 'जॉली एलएलबी 3'च्या रिलीजची डेट अद्याप जाहीर करण्यात आली नाहीये. 'जॉली एलएलबी 3' चं दिग्दर्शन सुभाष कपूर करणार असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी कोर्टात जॉली विरुद्ध जॉली अशी लढाई रंगणार आहे.

दरम्यान अक्षय आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो 'धूम 4', 'हाऊसफुल्ल 5', 'राऊडी राठौर 2', 'खेल खेल में', 'सिंघम अगेन', 'वेलकम टू द जंगल', 'मल्हार, 'स्काय फोर्स', 'कन्नप्पा' आणि 'सरफिरा' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. दुसरीकडे अर्शद हा 'वेलकम टू द जंगल'मध्ये अक्षयसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

India reaction on Trump tariff: ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर फोडलेल्या टॅरिफ बॉम्बनंतर आता भारतानेही स्पष्ट केली भूमिका!

Jaya Bachchan warn Priyanka Chaturvedi: जया बच्चन राज्यसभेत बोलताना अचानक शेजारीच बसलेल्या प्रियंका चतुर्वेदींवर उखडल्या, म्हणाल्या...

Trumps Tariff Bomb: ट्रम्प 'टॅरिफ'मुळे भारताच्या टेक्सटाईल्स, फार्मासह 'या' ५ उद्योगांना बसणार फटका, पाहा संपूर्ण लिस्ट

Amit Shah Rajya Sabha Speech: ‘माझ्याशी तर निपटा, पंतप्रधानांना कशाला बोलावताय, आणखी त्रास होईल’’

Prakash Solanke: प्रकाश सोळंकेंनी गळाला लावलेले बाबरी मुंडे नेमके कोण? पंकजांसह धनंजय मुंडेंना जबरदस्त धक्का!

SCROLL FOR NEXT