Anil Kapoor post for wife 
Premier

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Anil Kapoor emotional post for wife : अभिनेते अनिल कपूर यांनी त्यांच्या पत्नीसाठी इमोशनल पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. काय म्हणाले अनिल जाणून घेऊया या पोस्टमध्ये.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेते अनिल कपूर आज त्यांच्या लग्नाचा चाळिसावा वाढदिवस साजरा करत आहेत. 1984 मध्ये अनिल यांनी सुनीता भवनानी यांच्याशी लग्नगाठ बांधली. आज लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनिल यांनी त्यांच्या पत्नीसाठी खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.

अनिल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हंटलं कि,"चाळीस वर्षांपूर्वी या दिवशी मी माझ्या आयुष्यातील प्रेमाशी, माझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीशी आणि माझी सगळ्यात मोठी साथीदार असलेल्या सुनीताशी लग्नगाठ बांधली. त्या आधी 11 वर्षांपूर्वी सुनीता आपला प्रवास सुरु झाला. त्यानंतरचा प्रत्येक क्षण एक सुंदर गोष्ट आहे. आपल्या प्रेमाचे सुरुवातीचे दिवस ते आपल्या कुटूंबाची सुरुवात या प्रवासात अनेक अविस्मरणीय क्षण आहेत ज्यांनी माझं हृदय अभिमान आणि आनंदाने भरून येतं.

आपलं लग्न हे अनेक आव्हानांनी, रोमांचित घटनांनी आणि यशांनी भरलेलं, प्रेम आणि आदराच्या धाग्यांनी बांधलेलं एक नक्षीदार गालिचा आहे. तू प्रत्येकवेळी माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिलीस. तुझी ताकद, सौंदर्य आणि समजूतदारपणा मला कायमच एक उत्तम माणूस बनण्यासाठी प्रेरणा देतो.

तुझ्या असीम प्रेमासाठी, आधारासाठी आणि दृष्टिकोणासाठी तुझे आभार. आपण आपल्या या प्रवासातील एक मैलाचा दगड ओलांडत असताना आपण एकत्र घालवलेल्या प्रत्येक क्षणासाठी मी कृतज्ञ आहे. या चाळीस वर्षाच्या प्रवासाला, प्रेमाला, हसण्याला आणि एकत्र राहण्याला माझा सलाम. मी शब्दांत मांडू शकत नाही इतकं माझं तुझ्यावर प्रेम आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा."

सोबत त्यांनी या पोस्टमध्ये त्यांच्या लग्नापासूनचे सगळे जुने फोटो शेअर केले आहेत. अनेकांनी या फोटोवर कमेंट करत त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी सुद्धा त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

'मेरी जंग' हा सिनेमा साईन केल्यानंतर अनिल यांनी सुनीता यांना लग्नासाठी प्रपोज केलं. हा सिनेमा साइन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत या जोडीने लग्न केलं. लग्नानंतर तीनच दिवसात अनिल कपूर त्यांच्या सिनेमाच्या शूटिंगसाठी गेले तर सुनीता एकट्यात हनिमूनसाठी परदेशात गेल्या.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! आठव्या वेतन आयोगानुसार किमान 'इतका' असेल पगार, आकडा आला समोर

IND vs NZ 3rd T20I : भारताने जिंकली सलग नववी ट्वेंटी-२० मालिका! अभिषेक, सूर्यकुमारच्या वादळासमोर न्यूझीलंडचा पालापाचोळा

Accident News: भीषण अपघात! महामार्गावर दोन बसची समोरासमोर टक्कर; तिघांचा मृत्यू, अनेक जखमी

Indian Video : भारताला स्वातंत्र्य 99 वर्षांच्या करारावर मिळालंय? 2046 मध्ये इंग्रज परत येणार? वादग्रस्त व्हिडिओतील वक्तव्य कितपत खरं

Latest Marathi news Update : देश-विदेशातील दिवसभरातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT