Premier

Bobby Deol : बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी जेव्हा सलमानने केली बॉबीची मदत; शेअर केली बालपणीची खास आठवण

Bobby Deol shared his memories of childhood : अभिनेता बॉबी देओलने त्याच्या लहानपणीच्या आणि बॉलीवूड मधील सुरुवातीच्या काळातील काही खास आठवणी शेअर केल्या.

सकाळ डिजिटल टीम

'ॲनिमल' या सिनेमामुळे अभिनेता बॉबी देओल गेल्या बराच काळापासून चर्चेत आहे. धर्मेंद्र यांचा धाकटा मुलगा असलेल्या बॉबीने सुरुवातीच्या काळात वडिलांइतकीच प्रसिद्धी मिळवली आणि काही बॉलिवूडपासून लांब राहिल्यानंतर आता बऱ्याच काळाने बॉलीवूडमध्ये कमबॅक केलं. नुकतच 'कर्ली टेल्स'ला दिलेल्या मुलाखतीत बॉबीने त्याच्या काही खास आठवणी शेअर केल्या.

'कर्ली टेल्स'ला दिलेल्या मुलाखतीत बॉबीने त्याच्या करिअरविषयीची महत्त्वाची आठवण सांगितली. त्याने सांगितलं की, सलमानने त्याला अभिनेता म्हणून प्रसिद्ध मिळवण्यात मदत केली. तो म्हणाला, "त्याला कायमच मोठ्या सिनेमाचा भाग बनायचं होतं. कारण, त्याला फार लोक ओळखत नव्हते." बॉबीने सुरुवातीच्या काळात सलमानबरोबर एका सिनेमात काम केलं होतं. याविषयी सांगताना तो म्हणाला की," मला माहित होतं जर मी सलमान सोबत काम केलं तर लोक मला ओळखतील आणि तसंच झालं." तर हाउसफुल 4 मधील विनोदी भूमिकेमुळे त्याला लोक खासकरून लहान मुलं अजूनही ओळखतात हे सांगायला तो विसरला नाही.

या सगळ्या आठवणी शेअर करताना बॉबीने त्याची लहानपणीची आठवण शेअर केली. तो म्हणाला, "लहानपणी त्यांचे अनेक नातेवाईक गावावरून धर्मेंद्र यांना भेटायला यायचे. ते इथे आले की घरात मोहरीच्या तेलाचा सुगंध दरवळायचा. त्यावरून मला कळायचं की आलेले नातेवाईक आता माझ्या खोलीत राहणार आहेत आणि मला दुसरीकडे झोपावं लागणार आहे. लहानपणी मी खूप जाड होतो त्यामुळे सगळे मला गोलू म्हणायचे आणि माझे गाल खेचुन 'तू हिरो बनणार' असं म्हणायचे. त्यामुळे माझ्या डोक्यात फिट बसलं होतं की मी हिरो बनणार आहे पण हिरो म्हणजे काय हे नेमकं तेव्हा मला माहित नव्हतं.

ॲनिमल सिनेमापूर्वी बॉबीची आश्रम ही वेबसिरीज गाजली होती. या वेबसिरीजमध्ये त्याने एका स्वघोषित संताची भूमिका साकारली होती. या वेबसिरीजचे तीन सीज। रिलीज झाले होते. बॉबी आता हाऊसफुल 5 आणि कंगुवा या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओमराजे आता गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? धाराशीवच्या सभेत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, काय म्हणाले?

ZIM vs BAN 1st Test: २७ धावांत ८ विकेट्स... बांगलादेशची दुबळ्या झिम्बाब्वेसमोर शरणागती; Newman Nyamhuri ने वाट लावली Video

Akkalkot FoodSafety: अक्कलकोटमध्ये गुटखा, अन्नभेसळ, अशुद्ध पाणी व निकृष्ट दूधविक्रीवर धडक कारवाईची नागरिकांची जोरदार मागणी

Paithan Irrigation Project: ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेतील रखडलेले पूल; रस्ते खोदकामामुळे शेतकरी व वाहनधारकांचे हाल

Video : 20 लाखांची गाडी पण मनाने भिकारी! डिझेल भरल्यानंतर ड्रायवर पंपावरून पळाला, पेट्रोल भरणारा कासावीस होऊन मागे धावला अन्...

SCROLL FOR NEXT