actor darshan  esakal
Premier

अभिनेता दर्शनला जेलमध्ये दिसलं रेणुकास्वामीचं भूत; पहाटे जोरजोरात ओरडू लागला अभिनेता, पोलीस म्हणतात-

Actor Darshan Complain Renukaswami Ghost Haunted Him: दाक्षिणात्य अभिनेता दर्शन थुगुदीपा गेल्या चार महिन्यांपासून जेलमध्ये बंद आहे. मात्र आता त्याने दावा केला आहे की त्याला रेणुकास्वामीचं भूत दिसत आहे.

Payal Naik

आपल्या चाहत्याच्या हत्येप्रकरणी तुरुंगात बंद असलेला लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता दर्शन थुगुदीपा सध्या खूप चिंतेत आहे. दर्शनने असा दावा केला आहे की त्याला तुरुंगात रेणुकास्वामीचं भूत त्रास देतंय. दर्शन त्या तुरुंगातील सेलमध्ये एकटाच आहे. आणि त्याला रेणुकास्वामीचं भूत दिसतंय. त्यामुळे तो खूप घाबरलेला आहे. तो मानसिकदृष्ट्या खूप चिंतेत आहे. 'दैनिक भास्कर'ने दिलेल्या वृत्तानुसार, दर्शन थुगुडेपा याने तुरुंगातील अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की, त्याला रेणुकास्वामीचं भूत दिसत आहे. कारागृह अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सकाळी झोपेत असताना त्यांना दर्शनाचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला.

दर्शनचा आवाज आला

दर्शन याला त्याच्या चाहत्यांच्या खुनासाठी अटक करण्यात आली होती. गेले चार महिने दर्शन तुरुंगात बंद आहे. यापूर्वी असलेल्या तुरुंगात दर्शनचे चांगलेच लाड झाले होते. त्यानंतर त्याला दुसऱ्या तुरुंगात नेण्यात आलं. आता या सेलमध्ये तो एकटाच आहे. आणि इथे आपल्याला रेणुकास्वामीचं भूत दिसत असल्याचा दावा त्याने केला आहे. तर आपल्याला दर्शनच्या ओरडण्याचा आवाज आला असं पोलिसांनी सांगितलं आहे.

जामीनाची वाट पाहतोय अभिनेता

दर्शन अनेक दिवसांपासून त्याच्या जामिनाची वाट पाहत होता. त्याला जामीन मिळावा यासाठी त्याची टीम जोरदार प्रयत्न करत आहे. दर्शनच्या जामिनावर ३० सप्टेंबर रोजी सुनावणी झाली, मात्र त्यानंतर अभिनेत्याने पुढील तारीख मागितली होती. दर्शनाच्या जामीन अर्जावर ५ ऑक्टोबरला सुनावणी होऊ शकते, असे बोलले जात आहे. त्यांचा जामीन अर्ज आतापर्यंत दोन-तीन वेळा फेटाळण्यात आला आहे.

नाल्यात सापडला मृतदेह

दर्शन आणि त्याची मैत्रिण-अभिनेत्री पवित्रा गौडा यांना बेंगळुरू पोलिसांनी 11 जून रोजी रेणुकास्वामी हत्येप्रकरणी अटक केली होती. 9 जून रोजी रेणुकास्वामी यांचा मृतदेह बेंगळुरूच्या कामाक्षीपल्य परिसरात एका नाल्यात सापडला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता घटनास्थळावरून जप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दर्शन आणि पवित्रा गौडा दिसत होते. त्यांचे मोबाईल क्रमांकही याच परिसरात सक्रिय असल्याचे दिसून आले.

10 वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये

रेणुकास्वामी हा दर्शनाचा मोठा चाहता होता आणि तो पवित्रा गौडा हिला त्याच्यापासून दूर राहण्यास सांगत होता, असे सांगण्यात आले. पवित्रा विवाहित दर्शन थुगुदीपासोबत सुमारे 10 वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. पवित्राने रेणुकास्वामींच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केल्यावर त्याने अभिनेत्रीला आक्षेपार्ह मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. वैतागलेल्या पवित्राने दर्शनची मदत घेतली आणि अभिनेत्याला तिची हत्या करण्यास प्रवृत्त केले.

१९ जणांना अटक करून तुरुंगात टाकले

दर्शनने त्याच्या मित्रांच्या मदतीने रेणुकास्वामीला उचलून गोदामात नेले, त्याचा अतोनात छळ केला, मारहाण करून त्याचा जीव घेतला. या प्रकरणी पोलिसांनी १९ जणांना अटक केली असून ते तुरुंगात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT