Premier

Dhanush-Aishwarya Rajinikanth Divorce : धनुष अन् ऐश्वर्या रजनीकांतच्या नात्याला ब्रेक; घटस्फोटासाठी अर्ज दाखल

संतोष कानडे

Dhanush-Aishwarya Rajinikanth Divorce : अभिनेता धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्या रजनीकांत यांच्या वाटा आता वेगळ्या झाल्या आहेत. दोघांचं नात आता अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचलं आहे. दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.

धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याने चाहते खिन्न झाले आहेत. दोघांनी चेन्नईतल्या कौटुंबिक कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. एकमेकांच्या सहमतीने दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. काहीच दिवसांत या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होईल.

धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत हे मागच्या दोन वर्षांपासून एकत्र राहात नाहीत. २०२२ मध्येच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय जाहीर केला होता. वेगळं होण्याची घोषणा केल्यानंतर धनुष आणि ऐश्वर्याने घटस्फोट घेतला नव्हता. त्यांचं नातं पुन्हा बहरल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु ते कामात व्यस्त होते. आता त्यांनी अधिकृतरित्या वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.

धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांनी २००४ मध्ये लग्न केलं होतं. आठरा वर्षे त्यांनी एकत्रित संसार केला. लग्नावेळी धनुषचं वय २१ वर्षे होतं तर ऐश्वर्याचं वय २३ वर्षे होतं. दोघांना दोन मुलं आहेत. त्यांची नावं यात्रा आणि लिंगा अशी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

४० पैशांनी जीव जाणार नाही, प्रत्येक गोष्टीवर कर दिला पाहिजे; UPI शुल्कावर नीति आयोगाच्या उपाध्यक्षांचं विधान, सांगितली चाणक्यनीति

Kagal Municipal Council : कागल नगरपरिषदेतील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; हसन मुश्रीफ, समरजित घाटगेंच्या कारभारावर सवाल, कर्मचाऱ्यांचा ठिय्या

Gold Rate Today: अमेरिकेच्या एका निर्णयाने सोनं स्वस्त! महाराष्ट्रात 10 ग्रॅमचा भाव किती? सोन्याच्या दरात आणखी घसरण होणार?

Anant Nag: दिग्गज अभिनेते अनंत नाग यांना फाळके सन्मान, पंतप्रधानांनी ट्वीट करुन दिल्या शुभेच्छा

Kolhapur Crime: डॉ. सोनल वालावलकरला गर्भलिंग निदानप्रकरणी मोका, हॉस्पिटलवर छापा; डॉक्टर पसार

SCROLL FOR NEXT