dilip prabhavalkar sakal
Premier

Dilip Prabhavalkar: दिलीप प्रभावळकर रमले खास पत्रांच्या आठवणीत...

Prabhavalkar's innovative reading programmed 'Patra Patri' is currently in full swing: नाट्यरसिकांसाठी दिलीप प्रभावळकर यांनी खास पत्रप्रपंच आयोजित केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियासाख्या साधनांमुळे पत्रप्रपंच खूप कमी झाला आहे. मात्र, जुन्या काळातील पत्रांच्या आठवणी आजही आपल्या मनात रुंजी घालतात. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनीही डॉ. श्रीराम लागू यांनी लिहिलेल्या पत्रांची आठवण आजही आपल्या मनाच्या कप्प्यात जशीच्या तशी जपून ठेवली आहे.

‘हसवाफसवी’ हे नाटक पाहून लागू यांनी पत्र लिहून प्रभावळकर यांच्या अभिनयाचे कौतुक केले होते. हे पत्र आजही आपल्याला चांगले काम करायला बळ देतात, असे सांगतानाच नाट्यरसिकांसाठी दिलीप प्रभावळकर यांनी खास पत्रप्रपंच आयोजित केला आहे.

प्रभावळकरलिखित ‘पत्रा पत्री’ या नावीन्यपूर्ण अभिवाचन कार्यक्रमाचे प्रयोग सध्या जोरात सुरू आहेत. यासाठी ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांची त्यांना साथ लाभली आहे. बदामराजा प्रोडक्शन्सनिर्मित ‘पत्रा पत्री’ हा रंगाविष्कार मंचावर येणे आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळणे हे निश्चितच सुखावणारे आहे.

माधुरी गवांदे, निनाद कर्पे याचे निर्माते आहेत. पत्रलेखनातील ओलावा आणि आपुलकीची अनुभूती रसिकांना देण्यासाठी ‘पत्रा पत्री’चा प्रयोग करण्याचे ठरवल्याचे दिलीप प्रभावळकर यांनी सांगितले. प्रासंगिक आणि विडंबनात्मक पद्धतीचे लेखन या पत्रांत आहे. प्रत्येक पत्राला एक कथा आहे. अशा पाच कथा आम्ही अभिवाचनासाठी निवडल्या असल्याचे ते म्हणाले.

तात्यासाहेब आणि माधवराव या व्यक्तिरेखा बनून अनुक्रमे दिलीप प्रभावळकर आणि विजय केंकरे पत्रांचे अभिवाचन करत आहेत. या ‘दृक आविष्कारा’चे दिग्दर्शन विजय केंकरे यांचे असून रंगावृत्ती नीरज शिरवईकर यांची आहे. संगीत अजित परब यांचे आहे. प्रकाशयोजना शीतल तळपदे, तर वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT