Emraan Hashmi  Esakal
Premier

Emraan Hashmi : 'त्या' वक्तव्याबाबत इमरानला मागायची आहे ऐश्वर्याची माफी ; म्हणाला....

Emraan Hashmi want to apologies Aishwarya : अभिनेता इमरान हाश्मीने त्याला ऐश्वर्या रायची माफी मागायची आहे अशी कबुली एका मुलाखतीमध्ये दिली.

सकाळ डिजिटल टीम

Emraan Hashmi : अभिनेता इमरान हाशमी कायमच त्याच्या भूमिकांमुळे चर्चेत राहिला आहे. त्याच्या बोल्ड भूमिकांमुळे असो किंवा त्याच्या जबरदस्त अभिनयामुळे इमरान कायमच लाइमलाईटमध्ये राहिला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने ऐश्वर्याबाबत भूतकाळात केलेल्या वक्तव्याबाबत पश्चाताप होत असल्याचं म्हंटलं.

कॉफी विथ करणच्या चौथ्या पर्वत इमरान सहभागी झाला होता. यावेळी एक खेळ खेळताना इमरानने ऐश्वर्या राय-बच्चनला ‘प्लास्टिक’ म्हटलं होतं. त्याबद्दल त्याच्यावर त्यावेळी खूप टीकाही झाली होती.  २०१९ मधील फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीमध्ये ऐश्वर्याने याबद्दल नाराजीही व्यक्त केली होती. ती म्हणाली होती कि, "मी फेक आणि प्लास्टिक असल्याचं म्हटलं गेलं आहे; जे अत्यंत वाईट आहे." या वक्तव्यामुळे ऐश्वर्याने पुढे इमरानबरोबर काम केलं नाही अशा चर्चाही रंगल्या.

या घटनेबद्दल द लल्लनटापला दिलेल्या मुलाखतीमध्ये इमरानने पश्चाताप व्यक्त केला. तो म्हणाला कि,"हो. मला या गोष्टीचा पश्चाताप होतोय. मी जिच्याबाबत म्हणालो होतो, तिचा मी खूप सन्मान करतो. मला त्या वक्तव्याचा पश्चाताप होतोय, कारण ते अपमानजनक असू शकतं. आता लोक खूप जास्त संवेदनशील झाले आहेत. सोशल मीडियावर प्रत्येक गोष्टीवर नाराजी व्यक्त केली जातं आहे. जर ऐश्वर्या राय-बच्चनला वाईट वाटलं असेल तर मला तिची माफी मागायची आहे."

पुढे त्याने तो ऐश्वर्याचा एकेकाळी खूप मोठा चाहता होता असंही म्हणाला. त्याने सांगितलं कि,"मी स्वतः ऐश्वर्याचा खूप मोठा चाहता आहे. ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या वेळी ऐश्वर्या राय-बच्चनला पाहण्यासाठी मी तिच्या व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर ३ तास उभा होतो. त्यावेळेस मी ‘कसूर’ सिनेमाचं शूटिंग करत होतो आणि ऐश्वर्या ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाचं शूटिंग करत होती. मी अजूनपर्यंत तिला प्रत्यक्षात भेटलो नाहीये. पण जेव्हा मी भेटेन तेव्हा मी तिची माफी मागायला तयार आहे."

इमरानची १२ जुलैला 'शो टाईम' ही वेबसिरीज रिलीज झाली. हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेबसिरीज रिलीज झाली असून इमरान सध्या याच्या प्रोमोशनमध्ये बिझी आहे. बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी कलाकार करत असलेला संघर्ष, त्याच्यामागील यावर ही वेबसिरीज भाष्य करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: मुंबईत तिसऱ्या दिवशीही मुसळधार, लोकल सेवेचा खोळंबा, अनेक गाड्या रद्द, चाकरमान्यांचे हाल

Shivaji Maharaj : काय होता शिवरायांचा संतुलित आहार? युद्धासाठी नेहमी तंदुरुस्त राहण्यामागचं खरं रहस्य! आजच्या पिढीसाठी प्रेरणा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्याला झटपट बनवा चवदार ज्वारीची उकडपेंडी, सोपी आहे रेसिपी

MP Udayanraje Bhosale: उरमोडी प्रकल्प विस्ताराला केंद्राचा हिरवा कंदील: उदयनराजे भोसले; 'जल आयोगाकडून ३०४२.६७ कोटींचा निधी मंजूर'

मोठी बातमी! गणेशोत्सवापूर्वी शिक्षकांच्या पगारासाठी ‘हे’ विघ्न; सर्वांची कागदपत्रे ‘शालार्थ’वर अपलोड केल्यावरच मिळणार वेतन; वाढीव टप्पा अनुदानाचाही नाही निर्णय

SCROLL FOR NEXT