Amitabh Bacchan & Faizal Malik Esakal
Premier

Panchayat 3 : अमिताभ बच्चन यांच्याशी बोलल्यामुळे गमावली 'पंचायत'मधील प्रल्हादने नोकरी

Panchayat 3 fame Faizal Malik lost his job: अमिताभ बच्चन यांच्यामुळे फैजल यांना गमावावा लागली त्यांची नोकरी.

सकाळ डिजिटल टीम

Panchayat 3 : 'पंचायत ३' ही वेब सिरीज सध्या खूप गाजतेय. या शोमध्ये प्रल्हाद हे पात्रही खूप गाजतंय. ‘पंचायत ३’ या वेब सीरिजची सध्या खूप चर्चा आहे. ही भूमिका साकारली आहे अभिनेता फैजल मलिकने. या आधीही त्याने अनेक प्रोजेक्टस्मध्ये काम केलं आहे.

नुकतंच एका मुलाखतीत त्यांनी किस्सा सांगितला कि, अमिताभ बच्चन यांच्याशी खरं बोलल्यामुळे त्याला नोकरी गमवावी लागली.

आणि नोकरी गमावली

लल्लनटॉप ला दिलेल्या मुलाखतीत फैजल यांनी सांगितलं कि, "मी पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांना भेटायला गेलो आणि त्यांना भेटायला मिळणार म्हणून मी खूप उत्साही होतो. मी त्यांना भेटल्यावर आधी त्यांचा ऑटोग्राफ मागितला मग कामाविषयी बोलू लागलो.बिग बींच्या घरी आमच्यासाठी सारखं काही ना काही खायला येत होतं. आधीचं संपवण्यापूर्वी नवीन पदार्थांची प्लेट यायची. मी त्यांना सांगितलं की मी अलाहाबादचा आहे आणि मग ते माझ्याशी बोलू लागले. त्यांनी आम्हाला तिळाचे लाडू दिले. मी लाडू हातात घेण्यापूर्वीच त्यांनी दोन लाडू स्वतः खाल्ले होते. ते खरंच खूप तरुण आहेत.

ज्याने त्यांना स्क्रिप्ट वाचून दाखवली त्याला अतिआत्मविश्वास होता. पण अमिताभ यांनी ६२ क्रमांकाच्या पानावर एक चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर त्यांनी मला विचारलं कि आपण यावर काम कधी सुरु करू शकतो तेव्हा मी प्रामाणिकपणे उत्तर म्हंटलं कि, ‘सर, आपण आता हे शूट करायला नको, आपण हे सहा महिन्यांनी शूट करायला पाहिजे.’ मिटिंग संपवून खाली आलो तेव्हा मला तू या प्रोजेक्टवर काम करू नकोस असं सांगण्यात आलं."

पंचायतची कास्ट

दरम्यान, पंचायतच्या सीजन ३ मध्येही फैजल काम करत असून त्यांनी त्यांच्या प्रभावी अभिनयाने सगळ्यांचं मन जिंकलंय. त्यांच्याबरोबर रघुबीर यादव, जितेंद्रकुमार, नीना गुप्ता यांच्या मुख्य भूमिका आहेत. या आधीच्या दोन सीजननेही प्रेक्षकांची मनं जिंकली होती आणि आता प्रेक्षकन चौथ्या सिजनची वाट पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: सीईटी परीक्षेत अपयशाने विद्यार्थिनीने संपवलं जीवन, पुण्यातील लोहगाव परिसरातील धक्कादायक घटना!

Latest Marathi News Live Update : जीएसटी अनुदानात मोठी वाढ; नागपूर महापालिकेच्या तिजोरीला दिलासा

Cow National Animal Demand : गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा... सर्वात मोठ्या मुस्लिम संघटनेने सुरू केली मोहीम

Nagpur News: नागपुरात आज ‘इमॉर्टल आशा’ची सुरेल मैफल; रसिक अनुभवणार आशाताईंच्या गीतांचा सुवर्णकाळ

एकच झलक, सबसे अलग! चक्क 8000mAh बॅटरीसह Realme 16T 5G लाँच, दमदार फीचर्स अन् परवडणारी किंमत पाहा

SCROLL FOR NEXT