gashmeer mahajani with son vyom sakal
Premier

Gashmeer Mahajani : गश्मीर लेकाला देतोय स्वयंपाकाचे धडे

मराठीसोबत हिंदीमध्येही स्वतःची ओळख निर्माण करणारा अभिनेता गश्मीर महाजनी सोशल मीडियावर सुद्धा तितकाच लोकप्रिय आहे.

सकाळ वृत्तसेवा

मराठीसोबत हिंदीमध्येही स्वतःची ओळख निर्माण करणारा अभिनेता गश्मीर महाजनी सोशल मीडियावर सुद्धा तितकाच लोकप्रिय आहे. त्याचे डान्स रील्स असो किंवा त्याने चाहत्यांशी साधलेला संवाद त्याच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज सोशल मीडियावर चर्चेत असतात. नुकतंच गश्मीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये गश्मीर त्याचा लेक व्योमला सॅलड कसं बनवायचं हे शिकवतोय.

गश्मीरची पत्नी गौरीने हा व्हिडीओ शूट केला असून यात गश्मीर लेकाला व्हेज सॅलड कसं बनवायचं हे शिकवतोय. तो व्योमला आपण पनीरचे तुकडे तळून टाकूया असं म्हणतो. व्योमसुद्धा बाबा काय करतोय हे किचनमध्ये उभं राहून लक्षपूर्वक पाहताना दिसतोय. त्यानंतर गश्मीर त्याला सॅलड मिक्स कसं करायचं हे शिकवलं आणि व्योमने करून दाखवल्यावर गश्मीरने त्याचं कौतुकसुद्धा केलं. गश्मीरच्या चाहत्यांना हा व्हिडीओ आवडला असेल हे निश्चित.

या आधीही गश्मीरने सोशल मीडियावर शेअर केलेले व्योमचे व्हिडीओज खूप व्हायरल झाले होते. त्या दोघांचं एकत्र बॉण्डिंग असो किंवा व्योमला डोक्यावर घेऊन नाचणं असो. बापलेकाची ही धमाल पाहणं प्रेक्षक खूप एन्जॉय करतात.

गश्मीर सध्या अनेक सिनेमांच्या आणि वेबसिरीजच्या शूटमध्ये बिझी आहे. मुळशी पॅटर्न २ आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित आणखी एका सिनेमात तो दिसणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या मित्राला बाइक राइडची इच्छा, सलाइनसह नेलं फिरायला; VIDEO VIRAL

Ganesh Chaturthi 2025: तासगावला आहे गणपतीपुळ्याचे दुसरे स्थान, रथोत्सवाचे दक्षिण भारताशी आहे खास कनेक्शन

Maratha Reservation : आजही अफगाणिस्तानला भरते मराठ्यांच्या नावाने धडकी, ३०० वर्षे 'म्हणी' मधून जीवंत आहे मराठ्यांचा दरारा

CM M. K. Stalin : 'मतदार यादीतून नाव वगळणे दहशतवादापेक्षाही गंभीर आणि भयानक'; मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या इशाऱ्याचा काय अर्थ?

Fake Marriage Racket in Dharashiv: खोटा विवाह लावून देत तरुणाचे सव्वा लाख लाटले; नवरीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT