Bollywood Actor Govinda Esakal
Premier

Govinda Gun Fire: अभिनेता गोविंदाकडून मिसफायर, पायाला लागली गोळी; घरात पहाटे काय घडलं?

Actor Govinda Injured: स्वतःकडील बंदूक साफ करत असताना अनावधानाने स्ट्रीगर दाबले गेल्याने बंदुकीतून सुटली गोळी व बंदुकीतून सुटलेली गोळी त्याच्या पायाला लागली.

आशुतोष मसगौंडे

बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागली आहे. गोविंदाकडे परवानाधारक रिव्हॉल्व्हर आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना पहाटे पाचच्या सुमारास घडली आहे. गोविंदा पहाटे कुठेतरी जाण्यासाठी निघाले असताना हा अपघात झाला.

पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. गोविंदाची बंदूक जप्त करण्यात आली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

गोळी लागल्यानंतर गोविंदाच्या पायातून खूप रक्त वाहत होते. गोविंदाची प्रकृती सध्या कशी आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पत त्याला सध्या अंधेरीच्या क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घराबाहेर पडण्यापूर्वी गोविंदा आपली बंदुक साफ करत होता. त्यावेळी याच्याकडू मिसफायर झाल्याने त्याच्या पायाला गोळी लागली आहे.

अनावधानाने स्ट्रीगर दाबले गेल्याने बंदुकीतून गोळी सुटली व ती त्याच्या पायाला लागली. यानंतर जखमी झालेल्या गोविंदाला जवळच्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

गोविंदाचे व्यवस्थापक शशी सिन्हा यांनी एएनआयला सांगितले की, अभिनेता आणि शिवसेना नेता गोविंदा कोलकाता येथे जाण्याच्या तयारीत होता. त्यापूर्वी तो आपले परवाना असलेले रिव्हॉल्व्हर साफ करत असताना त्यातून चुकून गोळी झाडली गेली आणि त्याच्या पायाला लागली. डॉक्टरांनी गोळी काढली असून त्यांची प्रकृती ठीक आहे. तो आता रुग्णालयात आहे.

अभिनयासह राजकीय क्षेत्रातही काम केलेल्या गोविंदा याने यापूर्वी काँग्रेसचा खासदार म्हणूनही काम केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर त्याने शिवसेनेच्या उमेदवारांसाठी राज्यभरात प्रचारही केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT