Premier

Imran Khan : 'जाने तू या जाने ना' फेम इम्रानने केलं पहिल्यांदाच घटस्फोटावर भाष्य ; "आमचं लग्न..."

अभिनेता इम्रान खानने पहिल्यांदाच त्याच्या घटस्फोटावर भाष्य केलं. काय म्हणाला इम्रान जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता आमिर खानचा भाचा आणि 'जाने तू या जानेना' फेम अभिनेता इम्रान खान गेला बराच काळ सिनेविश्वापासून दूर आहे. गेल्या बराच काळात इम्रानचा कोणताही सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला नाहीये.

काही वर्षांपूर्वी त्याचा आणि अवंतिका मलिकचा घटस्फोट झाला. पहिल्यांदाच इम्रानने यावर भाष्य केलं.

घटस्फोटावर इम्रान व्यक्त

नुकतंच इम्रानने इंडिया टुडेला मुलाखत दिली. तेव्हा तो घटस्फोटाबद्दल भाष्य केलं. तो म्हणाला,"मला याविषयी जास्त बोलून त्यावरील गॉसिप वाढवायचं नाहीये पण माझा वैयक्तिक स्ट्रगल सुरु होता आणि मला दबाव जाणवत होता. या सगळ्यात माझं लग्न आणि माझं नातं काहीच मदत होणार नाहीये. कोणत्याही आदर्श नात्यामध्ये दोन्ही लोकांना अजून चांगलं करता, हेल्दी करता अधिक ताकदवान करता आणि एकमेकांना मदत करता त्यामुळे तुम्ही अधिक हेल्दी, चांगले आणि स्वतः एक उत्तम व्यक्ती बनता. आम्ही तसे नव्हतो."

इम्रानने दिली रिलेशनशिपची कबुली

वोग मॅगझीनला काही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत इम्रानने तो रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती. तो लेखा वॉशिंग्टनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. याबाबत तो म्हणाला होता कि, "लेखाला मी डेट करत असल्याच्या सध्या ज्या काही चर्चा सुरु आहेत त्या सगळ्या खऱ्या आहेत. फेब्रुवारी २०१९पासून मी घटस्फोटित असून मी माझ्या आधीच्या पत्नीपासून वेगळा राहतो. लेखाने आमचा संसार मोडला अशी चर्चा होती ज्याचा मला खूप राग येतो आणि हे फक्त कोणत्याही स्त्रीचा द्वेष आहे म्हणून नाही तर माझ्याही चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत."

इम्रान आणि अवंतिकाला इमारा नावाची मुलगी असून दोघेही एकत्र तिचा सांभाळ करतात. एका मुलाखतीत इम्रानने गुरुवार ते रविवार मुलगी त्याच्याकडे असते त्यामुळे त्या काळात तो कोणतंही काम नव्हतं असा खुलासा केला होता.

इम्रानने जाने तू या जानेना सिनेमातून पदार्पण केलं. त्यानंतर त्याने देल्ली बेल्ली, मेरे ब्रदर कि दुल्हन, एक में एक और तू यांसारख्या अनेक सिनेमांमधून काम केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख - भूमिकन्यांचा सन्मान

हिवाळ्याची खास चव! घरी बनवा गरमागरम गुळाची पोळी, रेसिपी इतकी सोपी की लगेच नोट कराल

आजचे राशिभविष्य - 02 जानेवारी 2026

10th Pass Govt Jobs: दहावी पास असाल? मग ही दिल्लीतील सरकारी नोकरी चुकवू नका, लगेच करा येथे अर्ज

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT