Kartik Aaryan New Movie Esakal
Premier

Kartik Aaryan : सलमाननंतर कार्तिक साकारणार 'प्रेम' ? ; सूरज बडजात्यांच्या आगामी सिनेमात काम करणार असल्याची चर्चा

Kartik is all set to work with Sooraj Barjatya : अभिनेता कार्तिक आर्यन सूरज बडजात्या यांच्या आगामी सिनेमात काम करणार असल्याचं म्हंटलं जातंय.

सकाळ डिजिटल टीम

Kartik Aaryan : अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी 'चंदू चॅम्पियन' या सिनेमामुळे चर्चेत आहे. कार्तिकच्या या आगामी सिनेमाची सगळीकडे चर्चा सुरु असतानाच कार्तिक आणखी एका बिग बजेट सिनेमात काम करणार असल्याचं म्हंटलं जातंय.

सूरज बडजात्यांच्या आगामी सिनेमात कार्तिक काम करणार असल्याचं म्हंटलं जातंय.

कार्तिक साकारणार प्रेम ?

सूरज बडजात्या लवकरच नवीन सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन करणार आहेत. सूरज बडजात्याच्या सिनेमातील प्रेम हे हिरोचं पात्र खूप गाजलंय. त्यांच्या आगामी सिनेमाचं नाव 'प्रेम कि शादी' असं असून या सिनेमासाठी आधी सलमान खानने करावी असं सूरज यांच्या मनात होतं. पण सलमानने या सिनेमाला नकार दिल्यामुळे त्यांनी कार्तिकला ही भूमिका ऑफर केल्याचं म्हंटलं जातंय.

पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, स्वतंत्र कुटूंब व्यवस्थेवर भाष्य करणारा सूरज बडजात्यांचा हा आगामी सिनेमा असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सिनेमाची तयारी सूरज यांच्या टीमने सुरू केली असून सूरज बडजात्या स्वतः कार्तिकबरोबर या सिनेमासाठी प्राथमिक बोलणी करत आहेत.

सूत्रांनी दिली माहिती

पिंकव्हीलाच्या हवाल्याने सूत्रांनी सांगितलं कि, "सूरज बडजात्या यांना एका अशा अभिनेत्याचा शोध आहे जो स्क्रीनवर निरागसपणाची भावना आणेल आणि सूरज यांना वाटतंय कि, कार्तिक आर्यन या सिनेमासाठी योग्य आहे आई नवीन जमान्यातील प्रेम या भूमिकेसाठी तो योग्य असेल. प्राथमिक स्तरावर असून लवकरच याबाबत घोषणा होईल. "

या बातमीनंतर सोशल मीडियावर कार्तिकने ही भूमिका साकारावी अशी इच्छा त्याच्या अनेक चाहत्यांनी व्यक्त केली आहे. कार्तिक या सिनेमाला होकार देणार का? हे जाणून घेण्यासाठी त्याच्या चाहत्यांना थोडी वाट पाहावी लागेल.

चंदू चॅम्पियनची चर्चा

या सिनेमाबरोबरच कार्तिकच्या लवकरच रिलीज होणाऱ्या चंदू चॅम्पियन सिनेमाची चर्चाही सोशल मिडीयावर रंगलीय. सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडिया गाजवतोच आहे आणि हा सिनेमा बघण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा १४ जून २०२४ ला रिलीज होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS T20I : भारत-ऑस्ट्रेलिया पुढचा सामना केव्हा? जाणून घ्या तारीख, ठिकाण, वेळ अन् live streaming details

Devendra Fadanvis Sugarcane Protest : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न; कोल्हापुरात ऊस दरावरून आंदोलन चिघळले, Video

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यातील बारा नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी होणार मतदान

किती तो वेंधळेपणा! गाडीत बसली, स्टेअरिंग हातात घेतलं पण लगेच खाली उतरली; तेजश्रीचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल हसू

Diabetes Breakthrough Discovery: आता रक्तातूनच समजणार डायबिटीजचा धोका; आयआयटी मुंबईतील संशोधकांचा शोध

SCROLL FOR NEXT