dharmveer 2 esakal
Premier

Dharmaveer 2: 'हिंदुत्वाची गोष्ट' सांगणार्‍या सिनेमाच्या प्रमोशनला अस्सल पठाण... लोकप्रिय अभिनेत्याचा सणसणीत टोला

Marathi Actor Targeted Dharmveer 2 Team: 'धर्मवीर २'चा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. त्यात अभिनेता सलमान खान याने हजेरी लावली होती.

Payal Naik

लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेता प्रसाद ओक यांचा 'धर्मवीर २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलर लाँचला अनेक मराठी अभिनेते हजर होते. अशोक सराफ ते महेश कोठारे यांनी हा ट्रेलर लॉन्चला हजेरी लावली. त्यातच लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता सलमान खानने देखील या कार्यक्रमाला विशेष हजेरी लावली. यावरून आता लोकप्रिय अभिनेत्याने 'धर्मवीर २' च्या टीमवर निशाणा साधला आहे.

अभिनेते किरण माने यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. ते त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळेही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. ते कायमच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील आणि मालिकाविषयीच्या गमतीजमती चाहत्यांसोबत शेअर करत असतात. ते नेहमीच आपलं मत बिनधास्तपणे मांडताना दिसतात. अशातच आता त्यांनी 'धर्मवीर २'च्या टीमवर टीका केली आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

काय आहे पोस्ट?

किरण यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत लिहिलं, 'छत्रपती शिवरायांनी सर्व जातीधर्मांचा आदर करणारं हिंदुत्व शिकवलंय आपल्याला. हिंदुत्व म्हणजे मुस्लीमद्वेष नव्हे, हे पटत नव्हतं ना? हा घ्या ढळढळीत पुरावा... 'हिंदुत्वाची गोष्ट' सांगणार्‍या सिनेमाच्या प्रमोशनला सुद्धा वन ॲन्ड ओन्ली, 'द सलमान खान' हा अस्सल पठाण लागला ! भारी वाटलं. धर्म ठेकेदारांना सलमानभाईच्या मागेपुढे करताना बघून लै लै लै भारी वाटलं.' यावर अनेक नेटकऱ्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा चांगलाच गाजला. त्यानंतर या चित्रपटातील संवादावरून वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील अनेक संवाद न पटणारे आहेत, जाणीवपूर्वक लिहिण्यात आलेले आहेत, राजकीय फायदा लक्षात ठेवून हा चित्रपट बनवण्यात आल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी या संवादांवर नाराजी व्यक्त केली होती. या चित्रपटात शिवसेना नेते आनंद दिघे यांचा मृत्यू कसा झाला हे दाखवण्यात येणार आहे असं सांगण्यात येतंय. हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Manager Work Pressure Death: खळबळजनक! बारामतीत 'Workload'मुळे बँक मॅनेजरने बँकेतच गळफास लावून दिला जीव

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरे दोन तास एकाच हॉटेलमध्ये; भेट झाली नसल्याची सूत्रांची माहिती

BMC Election: निवडणुकीनंतर 14 गावे बाहेर काढणार; गौप्यस्फोट करत वनमंत्र्यांनी यादीच दिली

Karad News : विधीमंडळातील मारामारीप्रकरणी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचा थेट सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले...

Rahul Gandhi: ''मोदीजी, 'त्या' पाच लढाऊ विमानांचं सत्य काय?'' राहुल गांधींकडून थेट निशाणा

SCROLL FOR NEXT