Kiran Mane Post For Nilu Phule Esakal
Premier

Kiran Mane : 'त्यांच्या एंट्रीला बाया तिरस्काराने धुसफुसायच्या' ; किरण मानेंची निळू भाऊंच्या आठवणीत खास पोस्ट, म्हणाले,"या अभिनेत्याने.."

Kiran Mane Post For Nilu Phule : अभिनेता किरण माने यांनी आज दिवंगत ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट लिहीत त्यांच्या काही खास आठवणी शेअर केल्या.

सकाळ डिजिटल टीम

Kiran Mane : अभिनेते किरण माने त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे कायमच चर्चेत असतात. फक्त राजकीयच नाही तर सामाजिक विषयांवर ते व्यक्त होतात. तर त्यांच्या आयुष्यातील काही खास आठवणीही ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करतात. नुकतंच त्यांनी केलेल्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्यासाठी किरण यांनी खास पोस्ट शेअर केली.

किरण यांची निळूभाऊंसाठी खास पोस्ट

किरण माने यांनी निळू फुलेंच्या काही खास आठवणी पोस्टमधून शेअर केल्या. ते म्हणतात,"१९८० नंतरचा काळ... मायणीमधलं 'गरवारे टूरींग टाॅकीज'. तंबू थेटरमध्ये 'शनिमा' बघताना घाबरुन आईला चिकटून बसलेला मी !
...कारन पडद्यावर 'कर्रकर्रकर्र' असा कोल्हापूरी चपलांचा आवाज करत 'त्यानं' एन्ट्री घेतलेली असायची.. बेरकी भेदक नजर - चालन्याबोलन्यात निव्वळ 'माज' - नीच हसनं... शेजारी बसलेल्या माझ्या गांवातल्या अडानी आया-बहिनी रागानं धुसफूसायला लागायच्या.. सगळीकडनं आवाज यायचा : "आला बया निळू फुल्या..! मुडदा बशिवला त्येचा. आता काय खरं न्हाय."

...थेटरमधल्या शांततेला चिरत त्यो नादखुळा आवाज घुमायचा "बाई,आवो आपला सोत्ताचा यवडा वाडा आस्ताना तुमी त्या पडक्यात र्‍हानार? ह्यॅS नाय नाय नाय नाय बाईSS तुमाला तितं बगून आमाला हिकडं रातीला झोप न्हाय यायची वोS"
आग्ग्गाय्य्यायाया...अख्ख्या पब्लीकमध्ये तिरस्काराची एक लाट पसरायची...

१९९० नंतरचा काळ...काॅलेजला मायणीवरनं सातारला आलेला मी. अभिनयाकडं जरा सिरीयसली बघायला सुरूवात झालेली... जुन्या क्लासिक मराठी-हिंदी-इंग्रजी फिल्मस् पाहून 'अभिनयवेड्या' मित्रांशी तासन्तास चर्चा - 'अभ्यास'... अशात एक दिवस 'सिंहासन' बघितला ! त्यात निळूभाऊंनी साकारलेला पत्रकार दिगू टिपणीस पाहून येडा झालो !! 'सामना' मधला हिंदूराव पाटील... 'पिंजरा' मधला परिस्थितीनं लोचट-लाचार बनवलेला तमासगीर..'एक होता विदूषक' मधला सोंगाड्याच्या भूमिकेचं मर्म सांगणारा लोककलावंत...! आईशप्पथ !! केवढी अफाट रेंज !!! भारावलो. 'सखाराम बाईंडर' नाटक वाचल्यानंतर भाऊंनी सखाराम कसा साकारला असेल ते 'इमॅजीन' करायचो कायम. पुढं ते जेव्हा कधी भेटले, तेव्हा मी मुद्दाम 'बाईंडर'चा विषय काढायचो आणि 'जीवाचा कान' करून त्यांना ऐकायचो.

...दूबेजींचं वर्कशाॅप केल्यानंतर त्यांच्या नाट्यसंस्थेनं निर्मिती केलेल्या एका कवितावाचनाच्या कार्यक्रमात मला सहभागी करून घेतलं गेलं. त्या निमित्तानं निळूभाऊंना जवळून पहाण्याचा योग आला. त्यानंतर बर्‍याच वेळा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने गाठीभेटी,चर्चा होत राहिल्या...निळूभाऊ सातारच्या माझ्या घरीही आले... तास-दोन तास दिलखुलास गप्पा मारल्या... विनम्रता एवढी की, समोरच्या माणसाला संकोच वाटावा !

जो काही छोटासा सहवास लाभला त्यात या 'महान' अभिनेत्यानं 'जगणं' शिकवलं...कलाकाराला 'भवतालाचं भान' कसं असावं याचा आदर्श याची देही याची डोळा पाहिला...

भाऊ, तुम्हाला जाऊन पंधरा वर्ष झाली !
पुणे-सातारा हायवेवर वेळेजवळ आजही तुमचा फोटो असलेलं होर्डींग झळकत असतं...
त्यावर लिहीलंय : 'मोठा माणूस' !"

किरण यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत निळूभाऊंच्या मोठेपणाच कौतुक केलं. निळू फुले यांच्याबरोबरच एक जुना फोटोही किरण यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. निळू भाऊ यांचं इंडस्ट्रीमधील योगदान अतुलनीय आहे आणि किरण यांनी याबाबत केलेल्या पोस्टचंही कौतुक होतंय. आज १३ जुलैला निळू फुलेंचा स्मृतिदिन आहे. यानिमित्त किरण यांनी ही खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT