Premier

Kishore Kumar Birth Anniversary : म्हणून अर्ध्या मिश्या कापून किशोर कुमार पोहोचले सेटवर ; मानधनाची शिस्त ते घराबाहेरचा बोर्ड, किशोर कुमार यांचे भन्नाट किस्से

Kishore Kumar Funny Memories : बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते किशोर कुमार यांचा आज वाढदिवस.त्यांचे काही भन्नाट किस्से जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Kishore Kumar Memories : भन्नाट अभिनय, कमाल कॉमेडी सेन्स आणि तितकाच गोड आवाज या जोरावर अभिनेते किशोर कुमार यांनी बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. अतिशय उत्तम कलाकार म्हणून ओळख असलेला या अभिनेत्याची आज ४ ऑगस्टला जयंती आहे. किशोर दा हे जितके मस्तमौला होते तितकेच त्यांच्या मानधनाच्या शिस्तीबाबत आणि अवखळ स्वभावासाठी प्रसिद्ध होते. जाणून घेऊया त्यांच्याविषयीचे काही भन्नाट किस्से

किशोर कुमार हे स्वभावाने काहीसे विनोदी असले तरीही त्यांच्या फी बाबत खूप कठोर होते. त्यांची फी त्यांना वेळेत मिळाली नाही कि ते निर्मात्यांना असा काही धडा शिकवायचे कि पुन्हा निर्माते तशी चूक करायचे नाहीत. यामागचं कारणही किशोर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

मानधन नाही मिठाईचा डबा

रेकॉर्डिंग स्टुडिओत पोहोचल्यानंतर किशोर कुमार आपल्या सेक्रेटरीवर लक्ष ठेवायचे. सेक्रेटरींनी पैसे मिळाल्याचे सूचित केलं तरच ते गाणं गायचे नाही तर घसा दुखत असल्याचं निमित्त करून निघून जायचे. एकदा संगीतकार आनंद जींनी याबद्दल त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं जेव्हा ते त्यांच्या नातेवाईकांच्या सिनेमांमध्ये गाणी गायचे तेव्हा ते नातेवाईक हातात बंगाली मिठाईचा बॉक्स फी म्हणून ठेवायचे. त्यामुळे किशोर यांनी असं वागण्याचा निर्णय घेतला. त्रास देणाऱ्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी किशोर कुमार यांनी हे अनोखं पाऊल उचललं.

अर्धी मिशी कापून सेटवर हजेरी

किशोर कुमार त्यांच्या कामाबाबत अतिशय गंभीर होते. जेवढी फी मिळते त्यानुसार ते काम करायचे. एकदा एका निर्मात्याने त्यांना अर्धी फी दिली. त्यावेळी ते काही बोलले नाहीत पण शूटिंग सुरु होताच ते अर्ध्या डोक्यावरील केस आणि अर्धी मिशी मुंडवून सेटवर आले. त्यांची ही अवस्था बघून दिग्दर्शक घाबरला. त्यांनी किशोर कुमार यांना काय झालं असं विचारलं. त्यावर किशोर कुमार यांनी सांगितले की, अर्ध्या फीमध्ये फक्त अर्धा गेटअप होईल. तर एकदा अर्धी फी दिल्यामुळे अर्धा मेकअप करून त्यांनी सेटवर हजेरी लावली होती.

'किशोर कुमारपासून सावध राहा'

अनेकदा लोकांच्या घराबाहेरच्या फलकावर 'कुत्र्यापासून सावध राहा' असं लिहिलेलं असतं पण किशोरदा यांच्या घराबाहेरील फलकावर लिहिलेलं होतं -'किशोर कुमारपासून सावध राहा'. हे त्यांनी स्वतःचं लिहून घेतलं होतं. यामागेही एक रंजक कथा आहे. एकदा निर्माता एच एस रवैल त्यांना पैसे देण्यासाठी त्यांच्या घरी गेले. पैसे दिल्यानंतर एच.एस.रवैल यांनी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला. किशोर कुमारच्या मनात काय आलं काय माहित त्यांनी त्यांनी रवैल यांचा हात चावला. रवैल संतापले आणि त्यांनी जाब विचारला त्यावर किशोर कुमार म्हणाले- "तुम्ही बाहेरचा साईनबोर्ड वाचला नाही का? किशोरवयीन मुलांपासून सावध रहा."

किशोर कुमार यांचा विसरभोळेपणा

गाणी रेकॉर्ड करण्याआधी सर्व निर्मात्यांकडून पैसे घेण्याची किशोरदांना इतकी सवय लागली होती कि, एकदा ते स्वतःच्याच चित्रपटातील गाणी रेकॉर्ड करत असल्याचाही त्यांना विसर पडला. ते गाणं रेकॉर्ड करण्यासाठी स्टुडिओत पोहोचले आणि सेक्रेटरीने खूण न केल्यामुळे ते गाणं रेकॉर्ड न करताच घरी निघून गेले. त्यानंतर सेक्रेटरींनी हा होम प्रॉडक्शनचा चित्रपट असल्याचं लक्षात आणून दिल्यावर आपणच सिनेमाची निर्मिती करत आहोत हे लक्षात आलं आणि त्यांनी हे गाणं पूर्ण केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Ayurvedic Prasad: गणेशोत्सवातील प्रसादातून मज्जाधातूचे पोषण; आयुर्वेदानुसार मोदक, पंचामृत, लाडू व लाह्यांचे मेंदूवर्धक गुण

आजचे राशिभविष्य - 11 सप्टेंबर 2026

Haritalika Ritual: हरितालिका व्रताचा खरा अर्थ काय? पार्वतीच्या तपश्चर्येपासून विवाहातील प्रेम, निवड, संयम आणि नात्यांच्या संतुलनापर्यंत

Ayurvedic Treatment: ३५व्या वर्षी हाडे ठिसूळ होऊन वारंवार फ्रॅक्चर का? आयुर्वेदातून काय मदत मिळू शकते; आहार, अभ्यंग आणि उपचाराबाबत जाणून घ्या

Lucky Zodiac Signs : 10 वर्षांनंतर जुळून आला 'त्रिग्रही योग'! 11 सप्टेंबरला मिथुन, धनुसह 5 राशींना लॉटरी लागण्याची शक्यता; जुन्या गुंतवणुकीतूनही मिळणार बंपर परतावा

SCROLL FOR NEXT