Kajol & Prabhudeva Esakal
Premier

Kajol & Prabhudeva : २७ वर्षांनंतर काजोल आणि प्रभुदेवा पुन्हा एकत्र; 'या' सिनेमात करणार काम

अभिनेत्री काजोल आणि अभिनेता प्रभुदेवा २७ वर्षानंतर पुन्हा एकत्र काम करणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या तिच्या विविध भूमिकांमुळे चर्चेत असते. वाढत्या वयामुळे काजोल आता स्वतःला कोणत्याही इमेजमध्ये बांधून न ठेवता वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. मागील काही काळात तिने केलेले सिनेमे आणि त्यातील तिचं काम याची चांगलीच चर्चा झाली होती.

आता तिचे 'सरजमीन' आणि 'माँ' हे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत आणि या दोन्ही सिनेमांमध्ये ती पूर्णपणे वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याबरोबरच ती पुन्हा एकदा अभिनेता, दिग्दर्शक आणि कोरियोग्राफर प्रभुदेवासोबत काम करणार आहे.

या आधी तिने प्रभुदेवाबरोबर २७ वर्षांपूर्वी 'मिनसारा कनावू' या सिनेमात काम केलं होतं. हा एक तामिळ सिनेमा होता. आता ती प्रभुदेवाबरोबर ती एका अॅक्शन सिनेमात काम करणार आहे. मीडिया रिपोर्टसनुसार, या सिनेमाचं दिग्दर्शन बागडोर सिनेमाचे दिग्दर्शक तामिळ फिल्ममेकर चेरन करणार आहेत.

मुंबईमध्ये पार पडणार शुटींगचं पहिलं शेड्युल

काजोल या सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात करणार असून मुंबईमध्ये या सिनेमाच्या शुटिंगचं पहिलं शेड्युल पार पडणार आहे. तिच्याबरोबर 'जवान' या शाहरुखच्या गाजलेल्या सिनेमाचे सिनेमॅटोग्राफर जीके विष्णूही या सिनेमाचं छायाचित्रण करणार आहेत.

सिनेमाबाबत अजूनही दोन्ही कलाकार आणि सिनेमाच्या टीमकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीये पण सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार ही एक पॅन इंडिया फिल्म असून ही तामिळ आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. काजोलची भूमिका, सिनेमाचं कथानक याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना थोडी वाट पाहावी लागेल.

काजोलच्या या सिनेमांचं झालं कौतुक

सेकंड इनिंगमध्ये काजोलने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. 'हेलिकॉप्टर इला' असो किंवा 'तान्हाजी' सिनेमात तिने साकारलेल्या सावित्रीबाई मालुसरे या तिच्या व्यक्तिरेखा खूप गाजल्या. याबरोबरच लॉकडाऊन मध्ये आलेल्या 'देवी' या शॉर्ट फिल्ममधील तिचं काम सगळ्यांना आवडलं. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांवर हा सिनेमा आधारित होता. बलात्कार या शब्दाचा उल्लेख न करताही महत्त्वाचा संदेश या सिनेमातून देण्यात आला होता. तिच्यासोबत मुक्ता बर्वेनेही काम केलं होतं. तसंच 'सलाम वेंकी' या सिनेमात तिने साकारलेली मुलाला इच्छामरण मिळावं म्हणून झगडणारी आईही सगळ्यांना आवडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : पीडीपी नेत्या इल्तिजा मुफ्ती यांनी बिजबेहरा येथील जाबलीपुरा फळ बाजारात फळ उत्पादकांच्या आंदोलनात सहभाग घेतला

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT