Actor Salman Khan Firing Case Lawrence Bishnoi Mumbai Police Crime Branch Recorded Salman Statement  Esakal
Premier

Salman Khan Lawrence Bishnoi News: बिश्नोई गँगकडून मिळणाऱ्या धमक्यांमुळे वैतागला सलमान खान; पोलिसांना सांगितलं सर्व काही

Salman Khan Lawrence Bishnoi News: 14 एप्रिलच्या पहाटे मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला होता. या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली होती.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबई: वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील खान कुटुंबीयांच्या निवासस्थानी १४ एप्रिलला झालेल्या गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेने नुकताच अभिनेता सलमान खान आणि भाऊ अरबाज खान यांचे जबाब नोंदवले आहेत. गोळीबारापूर्वी बिष्णोई टोळीकडून आलेल्या धमक्यांचा उल्लेख करत हा हल्ला जीव घेण्याच्या उद्देशानेच केल्याचा दावा सलमानने केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

एप्रिलमध्ये मुंबई पोलिसांनी सलमान खान आणि त्याचा भाऊ अरबाज खान यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी त्यांचे जबाब नोंदवले आहेत. एका अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, गुन्हे शाखेचे चार सदस्यीय पथक या महिन्याच्या सुरुवातीला वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गेले होते जेथे (खान) कुटुंब राहत होते.

या अधिकाऱ्याने सांगितले की, 4 जून रोजी सलमानचे सुमारे चार तास आणि त्याच्या भावाचे दोन तासांपेक्षा जास्त जबाब नोंदवण्यात आले. 14 एप्रिलच्या पहाटे मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला होता. या गोळीबाराच्या संदर्भात पोलिसांनी गुजरातमधून कथित शूटर विकी गुप्ता आणि सागर पाल यांना अटक केली.

या घटनेमागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचा पोलिसांचा दावा आहे. याप्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एक अनुज थापन याने 1 मे रोजी पोलिस लॉकअपमध्ये गळफास लावून घेतला होता. आणखी एका प्रकरणात, नवी मुंबई पोलिसांनी या महिन्याच्या सुरुवातीला सलमान खानवर हल्ला करण्याचा कट रचल्याप्रकरणी हरियाणाच्या बिश्नोई आणि गोल्डी ब्रार टोळीच्या कथित सदस्यासह पाच जणांना अटक केली होती.

टोळीतील चार सदस्यांनी सलमान खानच्या वांद्रे येथील घराजवळील पनवेल येथील फार्महाऊसची ‘रेकी’ केली होती, असे पोलिसांनी सांगितले होते. सलमान खान ज्या ठिकाणी शूटिंगसाठी जातो त्या ठिकाणीही हे लोक गेले. सध्या लॉरेन्स बिश्नोई एका वेगळ्या प्रकरणात गुजरातमधील अहमदाबाद येथील साबरमती तुरुंगात बंद आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, जबाब नोंदवताना सलमानने पोलिसांसमोर आपली निराशाही व्यक्त केली आहे. तसेच एका गुन्ह्यासाठी आधीच खूप त्रास सहन केला आहे आणि वेगवेगळ्या कोर्टात दंडही भरला आहे. विशेष बाब म्हणजे जोधपूरमधील शिकार प्रकरणातील आरोपी अभिनेता 1998 पासून या टोळीच्या निशाण्यावर होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT