Shah Rukh Khan Esakal
Premier

Shah Rukh Khan: किंग खानची प्रकृती बिघडली! अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल, उन्हाचा त्रास झाल्याची माहिती

Shah Rukh Khan: अभिनेता किंग खान शाहरुख खानची प्रकृती बिघडल्याचं वृत्त आहे. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उन्हाचा त्रास झाल्यानं त्याला हा त्रास झाल्याची माहिती मिळते आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

अभिनेता किंग खान शाहरुख खानची प्रकृती बिघडल्याचं वृत्त आहे. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उन्हाचा त्रास झाल्यानं त्याला हा त्रास झाल्याची माहिती मिळते आहे.

उन्हाचा त्रास होऊ लागल्यामुळे शाहरुख खानला अहमदाबाद येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू आहे. शाहरुखला रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्याला लवकर बरं वाटावं यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानला अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल (मंगळवारी) आयपीएल टीमला सपोर्ट करण्यासाठी तो अहमदाबादला गेला होता. आयपीएलचा पहिला प्ले-ऑफ पाहण्यासाठी गेलेल्या किंग खानला उष्णतेचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

शाहरुख खानला उष्मतेमुळे डिहायड्रेशन झाले. किंग खानला बुधवारी दुपारी दोन वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या शाहरूखला दाखल केलेल्या केडी रुग्णालयाबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शाहरुखची प्रकृती बिघडल्यामुळे त्याचे चाहते चिंतेत आहेत. त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी करू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये केकेआर संघाला सपोर्ट करण्यासाठी शाहरुख मंगळवारी गुजरातला पोहोचला. सोमवारी त्याने मुंबईत मतदान केले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो टीमला सपोर्ट करण्यासाठी अहमदाबादला पोहचला. पण उष्णतेमुळे त्याला खूप त्रास होऊ लागल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT