Malhar Movie Trailer Esakal
Premier

Malhar Movie : मल्हार सिनेमातून फॅमिली मॅन मधील 'या' अभिनेत्याचं मराठी सिनेमात पदार्पण

मल्हार या आगामी मराठी सिनेमातून बॉलिवूडमधील एक अभिनेता मराठी सिनेविश्वात पदार्पण करतोय.

सकाळ डिजिटल टीम

सध्या अनेक बॉलिवूडमधील कलाकार मराठी भाषेतील सिनेमांमध्ये काम करणंही पसंत करतात. बॉलिवूडमध्ये सध्या आघाडीचा असलेला अभिनेता शारीब हाश्मी. फॅमिली मॅनमुळे घराघरात पोहोचलेला शारीबची असुर ही वेबसिरीजही खूप गाजली आणि आता शारीब मराठी सिनेविश्वात पदार्पण करतोय.

शारीबचा 'मल्हार' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला. तीन वेगवेगळ्या कथा या सिनेमात पाहायला मिळणार आहे. कथा वेगवेगळ्या असल्या तरी त्या एकमेकांशी संबंधित आहेत.

त्यात शारीब एका गाईडची भूमिका साकारतोय. त्याच्यासोबत अंजली पाटील, ऋषी सक्सेना, श्रीनिवास पोकळे,मोहम्मद समद, अक्षता आचार्य आणि विनायक पोद्दार यांच्या मुख्य भूमिका आहेत.

या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये तीन कथा पाहायला मिळतात. गावाची प्रगती व्हावी म्हणून धडपडणारा गाईड, एक हिंदू मुलगा आणि त्याचा मुसलमान मित्र यांची अतूट मैत्री, एक विवाहित जोडपं आणि त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या आणि हिंदू मुलगा-मुस्लिम तरुणी यांची प्रेमकथा. या कथा या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

विशाल कुंभार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. ३१ मे २०२४ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

पहा ट्रेलर:

हा सिनेमा मराठीसोबत हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. प्रफुल्ल प्रसाद यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. मराठी भाषेतील शारीबच्या संवादाचं डबिंग करण्यात आलं आहे.

या सिनेमाबद्दल सिनेमाचे दिग्दर्शक विशाल कुंभार म्हणाले,"हा चित्रपट गावाकडील अनेक विषयांवर आधारित असून यात अनेक पात्रांचा समावेश आहे. प्रत्येक पात्राची एक वेगळी कथा आहे. मैत्री, प्रेम,विश्वास अशी भावनात्मक जोड प्रेक्षकांना यात बघायला मिळेल. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा एक नवा अनुभव असेल असे म्हणायला हरकत नाही. ‘मल्हार’ला प्रेक्षक पसंती दर्शवतील याची मला खात्री आहे."

दरम्यान, शारीब यांनी आजवर तरला, फिल्मिस्तान, माय क्लायंट्स वाईफ, द डेविल इनसाईड या सिनेमांमध्ये काम केलं आहे. स्लमडॉग मिलिनियर सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT