Sharmin Segal Esakal
Premier

Heeramadi : ट्रोलिंगवर अखेर शर्मीनने सोडलं मौन ; "मी आलमजेब या भूमिकेला..."

Sharmin reacts on trolling : अभिनेत्री शर्मीन सेगलने तिच्यावर होणाऱ्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली. काय म्हणाली शर्मीन जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Sharmin Segal : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हिरामंडी: द डायमंड बाजार' ही वेब सिरीज खूप चर्चेत आहे. या सिरींजचा पहिला सीजन गाजला आणि नुकतीच दुसऱ्या सीजनचीही घोषणा करण्यात आली. पण सगळ्यात जास्त चर्चा झाली ती अभिनेत्री शर्मीन सेगलची.

संजय यांची भाची असलेल्या शर्मीनने आलमजेब ही मुख्य भूमिका साकारली होती पण तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची निराशा केली आणि तिच्यावर खूप टीका झाली. पण अखेर शर्मीनने तिच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं.

शर्मीनने सोडलं मौन

न्यूज १८ च्या शोमध्ये शर्मीनने हजेरी लावली होती. यावेळी तिला तिच्यावर होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर अखेर शर्मीनने तिची प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली,"मी आलमजेब या भूमिकेला माझं सर्वस्व दिलं. आपण नेहमी नकारात्मक गोष्टींवर लक्ष देतो पण अनेक सकारात्मक गोष्टीसुद्धा आहेत ज्याबद्दल आपण कधीच बोलत नाही. सकारात्मक गोष्टींबद्दल बोलणं कदाचित पुरेसे मनोरंजक नसेल, म्हणून मी काही प्रमाणात त्या सकारात्मक गोष्टींकडे लक्ष देते.

असा एक वेळ होता जेव्हा मी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पण नंतर हळूहळू मला समजलं की मला जे काही प्रेम मिळतंय ते सुद्धा मी गमावतेय. आता मी त्या गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरूवात केलीये. गेल्या काही दिवसांपासून मी या सगळ्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू लागलीय. शेवटी प्रेक्षकांचं मतच कदाचित तुम्हाला सर्वोत्तम बनण्यासाठी मदत करेल."

मामांनी सावरली भाचीची बाजू

दरम्यान, संजय यांनीही एका मुलाखतीत त्यांच्या भाचीची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला होता. "शर्मीनचा चेहरा आलमजेबशी जुळतो, जिला तवायफ बनायचं नाही असे भाव तिच्या चेहऱ्यावर आहेत. आम्हाला अगदी निरागस दिसणारी, तवायफसारखी न बोलणारी कोणीतरी अभिनेत्री हवी होती. शर्मीनच्या भूमिकेला कविता लिहिण्यासाठी स्वतंत्र व्हायचे असते. ही गोष्ट समोर येताच मी आलमजेबसाठी शर्मीनची निवड केली." असं त्यांनी म्हंटलं होतं.

दुसऱ्या सीजनची चर्चा

काल म्हणजे ३ जून २०२४ ला हिरामंडीच्या दुसऱ्या सीजनची घोषणा मरीन ड्राइव्हवर फ्लॅश मॉब सादर करत करण्यात आली. सीजन २ विषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT