Shashank Ketkar Makeover Esakal
Premier

Video : 'मुरांबा' मालिकेत शशांकचा अपघात ; चेहऱ्यावरची जखम दाखवण्यासाठी मेकअप आर्टिस्टने घेतली मेहनत , व्हिडिओचं होतंय कौतुक

Shashank Ketkar shared behind the scene video of makeup : अभिनेता शशांक केतकरने सोशल मीडियावर जखम झाल्याचा मेकअप कसा केला जातो याचा व्हिडीओ शेअर केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Shashank Ketkar video : अभिनेता शशांक केतकर कायमच त्याच्या उत्तम अभिनयामुळे चर्चेत असतो. शशांक सोशल मीडियावर त्याच्या सेटवरचे बरेच फोटो व्हिडीओ शेअर करत असतो. नुकतंच त्याने त्याच्या सोशल मीडियावर मालिकेत सुरू असणाऱ्या कथानकावेळी जर जखमी असण्याचा सीन असेल तर त्याचा मेकअप कसा केला जातो याचा खास व्हिडीओ शेअर केला.

शशांक सध्या स्टार प्रवाहवरील मुरांबा या मालिकेत काम करतोय. या मालिकेत तो साकारत असलेल्या अक्षय या पात्राचा खून करण्यासाठी रेवा त्याला टेरेसवरून खाली ढकलते असं दाखवण्यात आलं आहे. यात अक्षयच्या डोळ्याजवळ जखम होते असं दाखवण्यात आलं आहे. ही जखम मेकअपने कशी बनवण्यात आली याचा व्हिडीओ शशांकने सोशल मीडियावर शेअर केला.

पहा व्हिडीओ :

शशांकने हा व्हिडीओ शेअर केल्यावर कॅप्शन मध्ये त्याचा हा मेकअप करणाऱ्या मेकअप आर्टिस्टचं भरभरून कौतुक केलं. "मी वचन दिल्याप्रमाणे हा माझा मेकओव्हर व्हिडीओ मी शेअर करतोय 😎
या मेकअप आर्टिस्टचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अक्षय असंच मस्त काम करत राहा रे" असं कौतुक शशांकने केलं.

शशांकच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्या मेकअप आर्टिस्टचं कौतुक केलंच. याशिवाय शशांकने दाखवलेल्या मोठ्या मनाचंही अनेकांनी कौतुक केलं. "मेकअप करणाऱ्या अक्षय चे कष्ट आहेत च 👍 मेकअप करून घेताना जी सहणशस्ती , एकाग्रतेने करून घेणं त्रास झाला तरीही शांत राहणे 👌 भरपूर कष्ट आहे 👍 दोघांनी खूप शुभेच्छा" अशी कमेंट एकाने व्हिडिओवर केली आहे तर एकाने "भरपूर कष्ट 👍🏻🫡 सलाम तुम्हा दोघांना" असं म्हणत दोघांचं कौतुक केलं.

Comments on shashank's vide

शशांकची मुरांबा ही मालिका सगळीकडे गाजत असून यात दाखवली अक्षय आणि रमाची जोडी अनेकांना आवडते. सध्या मालिकेत रेवा पुन्हा रमा आणि अक्षयच्या आयुष्यात आली आहे. रेवाला अक्षय आणि रमा धडा कसा शिकवणार हे पाहण्यासाठी पाहायला विसरू नका मुरांबा दररोज दुपारी २:३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is Rudali Tradition? : देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना 'रुदाली'ची उपमा; पण रुदाली म्हणजे कोण? काय आहे ही विचित्र परंपरा?

Thane News: शिवशाहीची धोकादायक अवस्था, व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाला जाग, अधिकाऱ्यांची सारवासारव

Adani Group Investment : दिवाळखोरीतून जाणाऱ्या ‘या’ कंपनीवर अदानी ग्रुप तब्बल १२५००००००००००० रुपये लावण्यास तयार!

Dhule News : धुळे जिल्हा बँकेचा 'कमाल': पीककर्ज वाटपात उद्दिष्ट ओलांडले, राष्ट्रीयीकृत बँका पिछाडीवर

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

SCROLL FOR NEXT