shatrughan & Sonakshi Esakal
Premier

Sonakshi & Zaheer Wedding : शत्रुघ्न सिन्हा लावणार लेकीच्या लग्नाला हजेरी; भांडणाच्या चर्चांवर अखेर पडदा

shatrughan sinha is about to attend daughter's wedding : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इकबाल यांच्या लग्नाला शत्रुघ्न सिन्हा हजेरी लावणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sonakshi Wedding: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा झहीर इकबालशी लग्न करणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. गेल्या बराच काळापासून त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती पण २३ जूनला ही जोडी लग्नबंधनात अडकणार असल्याचं निश्चित झालं आहे.

आता नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार शत्रुघ्न सिन्हा लेकीचं लग्नाला हजेरी लावणार आहेत. पहलाज निहालींनी हो गोष्ट स्पष्ट केली.

झूम टीव्हीने शेअर केलेल्या वृत्तानुसार, नुकतंच त्यांनी पहलाज निहलानी यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी शत्रुघ्न सिन्हा सोनाक्षीच्या लग्नाला उपस्थित राहणार असल्याचं स्पष्ट केलं. या वृत्तामुळे सोनाक्षी आणि सिन्हा कुटुंबामध्ये वाद असल्याच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

सोनाक्षी आणि सिन्हा कुटूंबामध्ये वाद असल्याची चर्चा

सोनाक्षी झहीरशी लग्न करत असल्यामुळे सिन्हा कुटूंब आणि तिच्यामध्ये वाद असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यातच सोनाक्षीच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्यावर शत्रुघ्न यांनी या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांना याबाबत काहीच माहित नसल्याचं सांगितलं. तसंच माझ्या मुलीने मला याबाबत काहीही माहिती दिली नसल्याचं ते म्हणाले. त्यातच सोनाक्षीचा भाऊ लव सिन्हानेही त्याला याबाबत काहीही माहित नसल्याचं सांगितलं. त्यामुळे या चर्चा अधिक रंगल्याच पाहायला मिळालं.

सोनाक्षीच्या लग्नाचे डिटेल्स

सोनाक्षी आणि झहीर २३ जूनला लग्न करणार असून दादरमधील बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडणार असून ते दोघेही रजिस्टर पद्धतीने लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाचा ड्रेस कोड फॉर्मल वेस्टर्न ठेवण्यात आला आहे. त्यांच्या लग्नाला दोन्ही कुटूंबीय उपस्थित राहणार आहेत.

त्यांच्या लग्नाची पत्रिकाही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सोनाक्षी आणि झहीरच्या पत्रिकेवर एक व्हॉइस नोट आहे. तर बॅकग्राऊंडला आफरीन हे गाणं ऐकू येत आहे. कार्डमध्ये सांगितल्याप्रमाणे कार्यक्रम ८ वाजता सुरू होईल. तर ड्रेसकोड फॉर्मल कपडे असून लाल रंगाचे कोडे घालण्यास मनाई करण्यात आली आहे.

गेली दोन वर्ष सोनाक्षी आणि झहीर एकमेकांना डेट करत असून सलमान खानच्या एका पार्टीमध्ये त्या दोघांची ओळख झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : पुण्यात प्रेशर मिड आणि प्लाझ्मा वर बंदी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा सुरू

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT