Subodh Bhave sakal
Premier

Lok Sabha Elections 2024: "मला त्यात शून्य इंटरेस्ट, पण कोणाला मत द्यायचं हे..."; राजकारणाविषयी विचारलेल्या प्रश्नाला सुबोध भावेचं उत्तर

Subodh Bhave on Lok Sabha Elections: माध्यमांसोबत बोलताना सुबोधनं लोकांना मतदान देण्याचे आवाहन केलं.

priyanka kulkarni

Subodh Bhave: आज लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) चौथ्या टप्प्याचं मतदान होत आहे. विविध सेलिब्रिटी त्यांचा मतदानाचा हक्क बजावत आहेत. अभिनेता सुबोध भावेनं देखील मतदान केलं आहे. मतदान केल्यानंतर सुबोधनं माध्यमांसोबत बोलताना लोकांना मतदान देण्याचे आवाहन केलं.

सुबोध म्हणाला, "लोकसभेचं, विधानसभेचं मतदान कधी आहे? हे आपल्याला माहित असते. त्याआधी आपलं यादीत नाव आहे का? आपल्याकडे ओळख पत्र आहे? हे एकदा चेक करा. मतदान करणे हे आपलं कर्तव्य आहे, ते आपण पार पाडलंच पाहिजे. तुम्हाला जर मतदान करायचं असेल तर कोणतीच शक्ती तुम्हाला थांबवू शकत नाही. मतदान करणं ही आपली जबाबदारी आहे. घराबाहेर पडा आणि मतदान करा"

त्यानंतर पत्रकारांनी सुबोधला राजकारणाबद्दल प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना तो म्हणाला, "मला राजकारणाबद्दल काहीच बोलायचं नाही, मला त्यात शून्य इंटरेस्ट आहे, पण मला माहित आहे की, कोणाला मत द्यायचं आहे. मतदान करणं माझं कर्तव्य आहे, जे मी पार पाडत आहे."

मतदानाची टक्केवारी घसरत आहे, याबद्दल देखील सुबोधला प्रश्न विचारण्यात आला. याबद्दल तो म्हणाला, "मत द्यायला कंटाळा करु नका, हे पाच ते दहा मिनिटांचे काम आहे. मतदानाची टक्केवारी कमी झाली तर तुम्हाला जो उमेदवार निवडून येऊ नये असं वाटत असेल तर तो कदाचित निवडून येईल. तुम्हाला वाटत असेल की, बदल घडला पाहिजे, तर घराबाहेर पडा आणि मतदान करा."

सुबोधनं सोशल मीडियावर त्याचे काही फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "लोकशाहीचा हा उत्सव साजरा करूया, मतदान करूया! आम्ही करून आलो, तुम्हीही करा! जय हिंद!"

सुबोध लवकरच तू भेटशी नव्याने या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत शिवानी सोनार देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सुबोधच्या या मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला. या प्रोमोला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT