Aditi Dravid bought new house in Mumbai 
Premier

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अदिती द्रविडने केला गृहप्रवेश ! पहा मुंबईतील घराची पहिली झलक

Aditi Dravid bought new house in Mumbai : अभिनेत्री अदिती द्रविडने मुंबईत स्वतःचं घर विकत घेत अक्षय तृतीयेच्या मुहूर्ततावर गृहप्रवेश केला. सोशल मीडियावर तिने तिच्या घराची पहिली झलक शेअर केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सगळेचजण काही ना काही नव्या वस्तूची खरेदी करत आहेत. आपल्या हक्काचं घर असावं असं अनेकांचं स्वप्नं असतं आणि हे स्वप्न अभिनेत्री अदिती द्रविडने पूर्ण केलंय. मुंबईत अदितीने स्वतःचं घर विकत घेतलं असून आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तिने तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला.

सोशल मीडियावर अदितीने तिच्या नव्या घराची पहिली झलक शेअर करत ही आनंदाची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली. "And finally, I said YES, to Mumbai! 🧿 #स्वतःचं #घर #स्वप्नपूर्ती" (आणि अखेर मी मुंबईला हो म्हणाले!) असं कॅप्शन अदितीने या फोटोला दिलं आहे, घरातील गृह्प्रवेशाच्या पूजेचा आणि घराची चावी आणि खिडकीतून दिसणाऱ्या दृश्याचा फोटो अदितीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. अदितीचं घर आठव्या मजल्यावर असून घराच्या खिडकीतून दिसणारा सुंदर व्ह्यू सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय.

अदितीच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी आणि मित्र-मंडळींनी कमेंट करत तिचं अभिनंदन केलं. अभिजीत खांडकेकर, सुप्रिया पाठारे, समृद्धी केळकर,सावनी रविंद्र यांनी अदितीवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

अदितीने झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. या मालिकेत तिने शनायाची बेस्ट फ्रेंड आणि रूम मेट ईशा ही भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका खूप गाजली होती. त्यानंतर अदितीने कलर्स मराठीवरील 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत काम केलं. या मालिकेत तिने अभ्याची खास मैत्रीण नंदिनीची भूमिका साकारली होती. अनेकांना तिची ही भूमिका खूप आवडली. तर तिने 'बाईपण भारी देवा' सिनेमातील गाजलेलं मंगळागौर हे गाणंही लिहिलं आहे. याशिवाय अदितीने 'गोष्ट एका पैठणीची' या सिनेमातही काम केलं आहे.

याशिवाय अदिती लवकरच प्राजक्ताच्या फुलवंती या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात ती विशेष भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय तिने दिग्दर्शित केलेल्या 'इजाद' या शॉर्ट फिल्मला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: रेल्वेच्या चौथ्या लाईन साठी शेतीच्या अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

SCROLL FOR NEXT