Aditi Sarangdhar sakal
Premier

Marathi Actress: "मी प्रेग्नन्सीमध्ये बिअर प्यायचे, मला बिअरचे डोहाळे लागले होते...."; मराठमोळ्या अभिनेत्रीनं सांगितला प्रेग्नन्सीदरम्यानचा अनुभव

Marathi Actress: नुकत्याच एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अदितीनं तिला प्रेग्नन्सीदरम्यान आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे.

priyanka kulkarni

Aditi Sarangdhar: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अदिती सारंगधर (Aditi Sarangdhar) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. अदिती ही विविध युट्यूब चॅनल्सला मुलाखती देखील देते. या मुलाखतींमध्ये अदिती अभिनयक्षेत्रासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील सांगते. नुकत्याच एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अदितीनं तिला प्रेग्नन्सीदरम्यान आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे.

अदिती म्हणाली, "मला बिअरचे डोहाळे लागले होते"

अदितीनं आरपार नावाच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, "मी प्रेग्नन्सीच्या सुरुवातीला खूप एक्सायटेड असायचे. मला प्रेग्नन्सीमध्ये बिअरचे डोहाळे लागले होते. मग मी बिअर प्यायचेय. मी प्रेग्नन्सीदरम्यान इंडियन फूड खाल्ल नाही. मी फक्त सॅलड खात होते आणि बिअर प्यायचे. मी याबद्दल डॉक्टरांना देखील विचारलं. मी डॉक्टरांना सांगितलं की, बिअर प्यायले नाही तर मला कसं तरी होतं, चिडचिड होते. मग डॉक्टर मला म्हणाले की, एक-दोन सीप बिअर प्या. मग मी 9 महिने प्रेग्नन्सीमध्ये बिअर प्यायचे."

मुलाखतीत अदितीनं Postpartum depression बद्दल देखील सांगितलं आहे. ती म्हणाली, "Postpartum depression बद्दल देखील अदितीनं सांगितलं ती म्हणाली, बऱ्याच जणांना Postpartum depression बद्दल माहित नसतं. बाळ झाल्यानंतर बाई कधीही रडते, तिला मूड स्विंग्स होत असतात. लोकांना वाटतं की, हे नॉर्मल आहे. मला हे आवर्जून सांगायचंय की,बाळंतीण झालेल्या बाईची काळजी घ्या. ती बाई आनंदी राहिली तर ती बाळाची काळजी घेईलच."

अदितीचा आगामी चित्रपट

अदितीचा बाई गं हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामुळे सध्या अदिती चर्चेत आहे. या चित्रपटात अदितीसोबतच स्वप्निल जोशी आणि प्रार्थना बेहरे हे कलाकार देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: चाळीतली खोली ते 2BHK फ्लॅट! BDDवासियांना मिळाल्या नव्या घरांच्या चाव्या, ८६४ रहिवाशांची स्वप्नपूर्ती

चाबहार पोर्टजवळ अमेरिकेचे हल्ले, लढाऊ विमानातून बॉम्ब फेकल्यानं विध्वंस; भारतासाठी हे महत्त्वाचं बंदर

दुबईत ड्रोन हल्ल्यानंतर विमान उड्डाणं स्थगित, १९ भारतीयांसह ३५ जणांना युएईत अटक

Success Story : वडिलांचं सलूनचं दुकान, लेक बनला पीएसआय कवठेपिरानच्या ओंकार जाधवची ‘एमपीएससी’ परीक्षेत बाजी

IPL : विराट कोहलीने निवडली RCB ची आवडती प्लेइंग इलेव्हन; अनिल कुंबळेसह स्टार्क-चहललाही संधी

SCROLL FOR NEXT