Pandharpur Wari Esakal
Premier

Aashadhi Ekadashi 2024 : "तो जेव्हा बोलावतो तेव्हाच तुम्हाला दर्शन मिळतं "; 'या' मराठी अभिनेत्रीने केली पंढरपूरची वारी

Marathi Actress Shared Her Pandharpur Experience :आज आषाढी एकादशीनिमित्त एका मराठी अभिनेत्रीने पंढरपूरची वारी करत तिचा अनुभव शेअर केला.

सकाळ डिजिटल टीम

Aashadhi Wari : आज आषाढी एकादशीचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळतोय. सामान्यांच्या बरोबरीनेच सेलिब्रिटीजनी सुद्धा विठुरायाचं दर्शन घेत सगळ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. अनेकजण विठ्ठलभक्तीत तल्लीन झाले. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील एका अभिनेत्रीनेही पंढरपूरची वारी करत विठुरायाचं दर्शन घेतलं आणि तिचा अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला.

सुंदरा मनामध्ये भरली फेम अभिनेत्री अक्षया नाईकने आज पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत तिने तिचा अनुभव शेअर केला.

अक्षयाने सोशल मीडियावर पंढरपूरमधील व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडिओमध्ये तिने पंढरपूरमधील आज उत्सवाचं वातावरण, वारकऱ्यांची लगबग आणि विठ्ठलाला भेटण्यासाठी सगळ्या वारकऱ्यांना उत्साह टिपला आहे. तिने या व्हिडिओला,"ल्यावर्षी यादिवशी आम्ही पंढरपूरात होतो. आणि त्या माऊलीने इतक्या सहज आम्हाला त्याचं दर्शन होऊ दिलं नाही. पण ते म्हणतात ना, “तुम्ही तेव्हाच त्याला भेटू शकाल जेव्हा तो तुम्हाला बोलावतो.” कुणाल आणि माझा अनुभव साधारण तसाच काहीसा होता. हरिनामाचा गजर करत, प्रदक्षिणा घालत, तो कळस पाहून जेव्हा दर्शन झालं तेव्हा मनात असलेले सगळे विचार ठप्प आणि मी शून्य झाले. राम कृष्ण हरी " असं कॅप्शन देत तिचा अनुभव शेअर केला.

अक्षयाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये वारकऱ्यांचा आनंद, विठ्ठलाची प्रतिकृती घेण्यासाठी त्यांची सुरु असलेली धडपड, विठ्ठल मंदिराबाहेर सुरु असलेला विठ्ठलनामाचा गजर पाहायला मिळतोय. अक्षयाबरोबर कलर्स मराठीवरील अनेक कलाकारही या वेळी सहभागी झाले होते. तिच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत तिलाही आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आणि तिच्या पोस्टचं कौतुक केलं.

कलर्स मराठीवरील अक्षयाची 'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका गाजली होती. या मालिकेत तिने समीर परांजपेबरोबर स्क्रीन शेअर केली होती. बॉडीशेमिंगवर भाष्य करणाऱ्या या मालिकेने सगळ्यांची मनं जिंकली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vertical Property Card : महाराष्ट्रातील प्रत्येक सदनिकेला स्वतंत्र ओळख क्रमांक आणि मालकी हक्कांची सरकारी नोंद मिळणार; महसूल विभागाकडून व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्डचा मसुदा खुला

Hinjewadi Metro : हिंजवडी-वाकडमधील मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी पीएमआरडीएचा निर्णय; २६ जोडरस्त्यांचा विकास, डिसेंबरअखेर प्रत्यक्ष कामांना सुरुवात

High Court Gift Deed Ruling : "२० वर्षांपूर्वी सुनेला बक्षीसपत्राने दिलेली मालमत्ता सासूला परत मागता येणार नाही!" उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

Jalgaon Jalna Railway Line Tunnel : मराठवाडा-खानदेशचा प्रवास सुसाट होणार! जळगाव-जालना रेल्वे मार्गावर बनणार देशातील सर्वात मोठा २३.५ किमीचा बोगदा; ३३६ किमीचे अंतर येणार थेट निम्म्यावर!

Pune News : स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला ‘डीआयएटी’चे बळ; अत्याधुनिक लेझर आणि फोटॉनिक्स प्रणाली विकसित करणार

SCROLL FOR NEXT