Alia Bhatt beautiful look at Met Gala 
Premier

Met Gala 2024 : बावनकशी सौंदर्य ; मेट गालाला आलियाच्या लूकने वेधलं लक्ष... 'हे' आहे तिच्या खास साडीच वैशिष्ट्य

Actress Alia Bhatt looks stunning in Sabyasachi Saree : अभिनेत्री आलिया भट्टने यंदाच्या मेट गाला २०२४ फेस्टिव्हलला हजेरी लावत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तिचा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Alia Bhatt : बहुप्रतीक्षित मेट गाला या फॅशन जगतातील मोठ्या फेस्टिव्हलला दणक्यात सुरुवात झाली. मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा कार्यक्रम पार पडतो. यावेळीही अनेक सेलिब्रिटीजच्या हटके लूकने सोशल मीडियाचं लक्ष वेधून घेतलं आहे आणि काही सेलिब्रिटीजच्या लूकची चर्चा आता सगळीकडे रंगली आहे .

अभिनेत्री आलिया भट्ट यंदाच्या मेट गाला फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालीये आणि तिच्या स्टायलिश लूकने तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

सब्यासाची ब्रँडने तयार केलेली सुंदर साडी नेसत आलियाने यंदाच्या मेट गालाला हजेरी लावली. सोशल मीडियावर तिने तिच्या या रेड कार्पेट लूकचे फोटोज शेअर केले आहेत. The Garden of Time हा ड्रेस कोड यंदा या फेस्टिव्हलला हजेरी लावणाऱ्या सेलिब्रिटीजसाठी ठेवण्यात आला आहे. या ड्रेस कोडवर आधारित वेस्टर्न आणि भारतीय संस्कृती दोन्हीचा मिलाफ असलेली सुंदर साडी नेसून आलियाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

मिंट ग्रीन रंगाच्या या साडीवर फुलांची आणि उत्तम दर्जाच्या खड्यांची नक्षी हाताने करण्यात आली होती. या साडीला साजेल असा हाय बन, बिंदी आणि साजेसा हेडबँड आणि flawless मेकअप तिने यावेळी केला होता.

स्वतःचे लूक इंस्टाग्रामवर शेअर करत तिने एक सोशल मीडियावर पोस्टही लिहिली. ती म्हणते," गार्डन ऑफ टाइम-कला आणि शाश्वततेचा संदेश या थीमसाठी हा लूक तयार करण्यात आला.

कालातीत राहणं कधीच संपू शकत नाही आणि आम्ही मान्य करतो कि, वेळ आणि काळ घेऊन केलेल्या गोष्टी कायम टिकतात. या जागतिक थीमचं भारतीय रूप तयार करताना या पोशाखाने स्वतःचा वेळ घेतला.

परंपरा आणि नावीन्य यांचं मूर्त स्वरूप साडीशिवाय दुसरं काही असूच शकत नाही. सब्यासाचीच्या कुशल हातांमध्ये या दृष्टीला त्याची पूर्ण अभिव्यक्ती सापडली. भूतकाळापासून उत्तम भविश्यासाठी प्रेरणा घेत आम्ही भारतीय परंपरेच्या शालीन परंपरेपासून प्रेरणा घेतली. आम्ही क्लिष्ट कारागिरीवर लक्ष केंद्रित केले, हाताने भरतकाम, मौल्यवान दगड, मोहक मणी आणि किनारी, 1920 च्या फ्रिंज शैलीतील वैशिष्ट्यांसह समाविष्ट केले. आमची कलर पॅलेट पृथ्वी, आकाश आणि समुद्राच्या प्रतिध्वनीत निसर्गाच्या सौंदर्याला अभिवादन करतेय.

आम्ही केशरचना आणि मेकअपसाठी एक नाजूक जुनी पद्धत वापरली - क्लिष्टपणे विणलेल्या वेण्या आणि मऊ फ्रिकल्सने सुशोभित केलेले एक उंची कॉईफर. वापरत आम्ही जुन्या पद्धतींना अभिवादन करण्याचा प्रयत्न केला.

हे तयार करणे हा एक वेगळा अनुभव होता. मजेदार आणि तितकाच तणावपूर्ण होता. १६३ लोकांनी मिळून ही सुंदर साडी विणली आहे ज्यात कुशल कारागीर, भरतकाम करणारे, कलाकार आणि रंगरंगोटी करणारे आहेत, १९६५ तास या कलाकारांनी काम केलं. मी हा पोशाख परिधान केल्यावर, या उत्कृष्ट निर्मितीला मूर्त रूप दिल्याबद्दल मला कृतज्ञ वाटतंय, अमर्याद प्रेम आणि कष्टाळू प्रयत्नांचा दाखला म्हणजे ही साडी आहे. "

अशी पोस्ट लिहीत आलियाने ही साडी डिझाईन करणाऱ्या आणि विणणाऱ्या सगळ्या कारागिरांचे आभार मानले.

सोशल मीडियावर आलियाच्या लूकचं कौतुक होत असून अनेकांनी कमेंट्स करत ती सुंदर दिसत असल्याचं म्हंटलं. आलियाचा लुक सगळ्यांना आवडला असून ती खुप सुंदर दिसत असल्याचं अनेकांनी म्हंटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Men Hockey Asia Cup: भारत पुन्हा आशियाचा बादशाह! आशिया कप फायनलमध्ये कोरियाचा पराभव, चषकावर चौथ्यांदा ताबा मिळवला

Lalbaugcha Raja Visarjan: सर्व अडथळे पार करून ३३ तासांच्या मार्गक्रमणानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न

Mohol News : सोलापूर-पुणे महामार्गावर अज्ञात पुरुषाचा कुजलेला मृतदेह सापडला, मोहोळ पोलिसांचा तपास सुरू

Ganpati Visarjan 2025 : देगलूरनगरीत ढोल, ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप; पुढच्या वर्षी लवकर या... या घोषणेने शहर दुमदुमले...!

उत्सवप्रिय सोलापुरात पहिल्यांदाच डीजेमुक्त मिरवणुका! पोलिस आयुक्तांचे मायक्रो प्लॉनिंग, सोलापूर कृती समितीसह सर्व सोलापूरकरांचा पुढाकार

SCROLL FOR NEXT