Kangana Ranaut : बॉलिवूडमधील कायम वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री आणि लोकसभा खासदार कंगना रनौतचं लोकसभेतील सदस्यत्व रद्द होणार असल्याची चर्चा ताजी असतानाच तिच्या बद्दलची आणखी एक महत्त्वाची बातमी सध्या गाजतेय. कंगना तिचं मुंबईतील वांद्रे परिसरातील पाली हिल येथील घर विकण्याचा विचार करत असल्याचं समजत आहे. या घरात कंगनाची 'मणिकर्णिका फिल्म्स'चे ऑफिसही आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार कंगना हे घर ४० कोटी रुपयांना विकणार असल्याचं दावा केला आहे पण याबाबत अभिनेत्रीने कोणतीही माहिती शेअर केली नाहीये.
कंगना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मंडी येथून भाजपाची उमेदवार म्हणून निवडणूक लढली आणि त्यात विजयी झाली. तिचं राजकीय करिअर सुरु झाल्यामुळे सध्या तिचा बराचसा वेळ दिल्ली आणि हिमाचल प्रदेशमध्ये ती घालवते आणि म्हणूनच ती मुंबईतील घर विकणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत.
'कोड इस्टेट' नावाच्या यूट्यूब चॅनलने एक व्हिडीओ शेअर केल्यानंतर या चर्चाना वेग आला. या व्हिडिओमध्ये कंगनाचं घर आणि ऑफिस विक्रीसाठी असल्याचा दावा करण्या आला आहे पण या वृत्ताला अजून अभिनेत्रीने कोणत्याही प्रकारची दुजोरा न दिल्यामुळे सगळेचजण संभ्रमात आहेत. कंगनाचे चाहते आणि चित्रपटसृष्टीशी संबंधित लोक या बातमीवर लक्ष ठेवून आहेत.
कालच या युट्युब चॅनेलवर या पाली हिलमधील बंगल्याची झलक शेअर करण्यात आली असून या व्हिडिओमध्ये अँकरने हा बंगला एका सेलिब्रिटीशी संबंधित आहे असा उल्लेख केला आहे. सकाळने हा व्हिडीओ पाहिला असता हा कंगनाच्याच बंगल्याचा व्हिडीओ असल्याचं निदर्शनास आलं आहे. पण सदर व्हिडिओमध्ये कंगनाचं आणि तिच्या प्रॉडक्शन हाऊसचं कुठेच नाव घेण्यात आलं नाहीये. पण अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून हा बंगला तिचाच असल्याची खात्री पटवली आहे.
व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या प्रॉपर्टीचा आकार 285 स्क्वेअर मीटर आहे, ज्यामध्ये बांधकाम क्षेत्र 3042 स्क्वेअर फूट आहे. याशिवाय 500 स्क्वेअर फूट अतिरिक्त पार्किंग एरिया देखील आहे. दोन मजली असलेल्या या बंगल्याची किंमत 40 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.
या आधी कंगनाची या बंगल्यावर अनधिकृत काम केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. तर कंगनाने याबाबत मुंबई महानगरपालिकेवर केस करत नुकसान भरपाई मागितली. पण नंतर ही केस मागे घेण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.