Marathi actress look in Cannes 2024 Esakal
Premier

Cannes Film Festival 2024 : आईची साडी आणि मराठमोळा साज करून अभिनेत्रीची कानच्या रेड कार्पेटवर हजेरी ; "आई तुला विमानातून फिरवण्याचे माझे स्वप्न अधुरे..."

Cannes Film Festival 2024 : कानच्या रेड कार्पेटवर मराठी अभिनेत्रीने पारंपरिक पोशाखात हजेरी लावली. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर सध्या चर्चा आहे ती कान फिल्म फेस्टिव्हलची. फ्रान्समध्ये पार पडणाऱ्या या सर्वात मोठ्या फेस्टिव्हलचं यंदाचं हे 77 वं वर्षं आहे. यंदाच्या कान फेस्टिव्हलचे अनेक व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अनेक बॉलिवूड कलाकारांनी यंदाच्या कान सोहळ्याला हजेरी लावली. त्यांच्या रेड कार्पेट लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि अशातच एका मराठी अभिनेत्री पारंपरिक मराठमोळ्या पोशाखात कानच्या रेड कार्पेटवर हजेरी लावण्यासाठी पोहोचलीये.

मराठीसोबत बॉलिवूडमध्येही स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) यंदाच्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहे आणि कानच्या रेड कार्पेटवर त्या त्यांच्या आईच्या साडीमध्ये हजेरी लावणार आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी ही बातमी सगळ्यांना सांगितली.

सोनेरी रंगाची साडी आणि त्यावर जांभळ्या रंगाचा ब्लाउज, केसात गजरा आणि नाकात पारंपरिक नथ या लूकमध्ये छाया कानचं रेड कार्पेट गाजवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या आईची साडी नेसली आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्या म्हणतात,"आई तुला विमानातून फिरवण्याचे माझे स्वप्न अधुरे राहिले.
...पण आज तुझी साडी आणि नथ मी विमानातून कान्स फिल्म फेस्टीव्हल पर्यंत घेऊन आले, याचे समाधान आहे. तरी आई ! आज तू हवी होतीस. हे सगळं पाहण्यासाठी. Love you मम्मुडी आणि खूप खूप मिस यू"

छाया यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांच्या लूकचं कौतुक केलं. परदेशात असूनही त्यांनी त्यांची परंपरा जपली म्हणून त्यांचा अभिमान वाटत असल्याचं अनेकांनी म्हंटलं.

दरम्यान, किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडिज’ चित्रपटात छाया यांनी मंजू माईची भूमिका साकारलीये. त्यांच्या या भूमिकेचं सध्या खूप कौतुक होतंय तर 'मडगांव एक्स्प्रेस' या सिनेमातील त्यांची भूमिकाही खूप गाजली. त्यांचे दोन्ही सिनेमातील डायलॉग्ज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर त्यांच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

Arattai messaging app : स्वदेशी मेसेजिंग ॲप ‘Arattai’ची क्रेझ वाढली! ; आता आनंद महिंद्रांनीही केलंय डाउनलोड

Barshi Crime : बार्शीत एसटी महामंडळ बसच्या महिला वाहकास मारहाण; सहा महिलांविरुद्ध गुन्हा

Akola News : खदान पोलीस स्टेशनमधील नितीन मगर निलंबीत, डीबी स्कॉडवर पुन्हा संशयाची सावली

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख आणि श्रीकांत ठाकरे ही राम-लक्ष्मणाची जोडी, उद्धव ठाकरे; संगीतकार स्व. श्रीकांत ठाकरे म्युझिक स्टुडिओचे उद्घाटन

Latest Marathi News Live Update: वृद्ध महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावणारा सराईत चोरटा गजाआड

SCROLL FOR NEXT