Chhaya Kadam Esakal
Premier

Chhaya Kadam : रेड कार्पेटवर 'ते' मराठी गाणं वाजलं अन् मी डान्स करायला सुरुवात केली; छाया कदम यांनी सांगितले 'कान'चे खास किस्से

छाया कदम यांनी कान फिल्म फेस्टिव्हलच्या काही खास आठवणी शेअर केल्या. रेड कार्पेटवरील त्यांच्या डान्सचा किस्सा जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

कान फिल्म फेस्टिव्हलला एका मराठमोळ्या अभिनेत्रीची चर्चा झाली. ती होती अभिनेत्री छाया कदम. छाया यांचा लूक असो किंवा त्यांचा अभिनय कानमधील त्यांच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा झाली. नुकतंच त्यांनी कानच्या काही खास आठवणी 'सकाळ डिजिटल'ला दिलेल्या मुलाखतीत शेअर केल्या.

रेड कार्पेटवर गुलाबी साडी गाणं अन्...

सकाळला दिलेल्या मुलाखतीत छाया यांनी त्यांची रेड कार्पेटवरील खास आठवण शेअर केली. त्या म्हणाल्या,"खरंतर रेड कार्पेटचं खूप दडपण होतं. आम्ही तिथे जेव्हा पोहोचलो तेव्हा गाडीतून उतरताना तिथे मराठी गाणं वाजलं. 'गुलाबी साडी' हे सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेलं गाणं त्यांनी लावलं आणि मग जे काय घडलं त्याच मी वर्णन करू शकत नाही. आम्ही खूप नाचलो. त्यावेळी सगळी भीती आणि सगळं दडपण विसरून गेलो. आपल्या भाषेतील गाणं लागल्यावर आपल्याला खूप छान वाटतं. मला बघून ए आर रहमान म्हणाले कि, ह्यांचं नाव एम एफ हुसेन असं ठेवायला पाहिजे असं म्हंटलं. "

पहा मुलाखत

मराठीतच सगळ्यांशी साधला संवाद

छाया यांनी तिथे सगळ्यांशी मराठीत संवाद साधला. इट्स मज्जा या चॅनेलला त्यांनी याबाबत मुलाखत दिली. त्या म्हणाल्या,"मला आधीपासूनच इंग्रजीची भीती होती. पण आता मला असं वाटतं की, मला नाही येत इंग्रजी भाषा बोलता तर ठीक आहे. मला माझं काम इथपर्यंत घेऊन आलं आहे. मला किती छान इंग्रजी बोलता येतं यासाठी मला कान्समध्ये बोलावलं नसून मला माझ्या कामासाठी व माझ्या चित्रपटासाठी इथं बोलावलं गेलं आहे. तरीही मी तिथे जाऊन तोडकं मोडकं इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करायचे. पण ते लोकंही फ्रेंच भाषा बोलतात तर त्यांनाही इंग्रजी बोलता येत नव्हतं. तर मी त्यांना गंमतीने यू डोन्ट नो इंग्लिश (तुम्हाला इंग्रजी बोलता येत नाही) असं म्हणायचे.

मी तिथल्या लोकांबरोबर हिंदी काय तर मराठीत पण बोलायचे. मला इंग्रजी भाषा नाही बोलता येत संपला विषय. तुम्हाला समजून घ्यायचे आहे तर तुम्ही समजून घ्या."

छाया यांच्या 'All we imagine as light' या सिनेमाला कान ग्रँड प्रिक्स या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या अवॉर्डने सन्मानित झालेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : 'आप' नेते सत्येंद्र जैन आणि इतर ४ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT