Divya Agarwal Esakal
Premier

Divya Agarwal : "प्रत्येक कथेचा शेवट..."; घटस्फोटांच्या चर्चांवर अखेर दिव्याने सोडलं मौन

अभिनेत्री दिव्या अगरवालने घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडलं असून तिची प्रतिक्रिया तिने सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली.

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस ओटीटी सीजन १ मुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिव्या अगरवालने अवघ्या तीन महिन्यांपूर्वी अपूर्व पाडगावकरशी लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नाची चर्चा संपते न संपते तोच तिच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं. दिव्याने सोशल मीडियावरून तिच्या लग्नाचे फोटो डिलीट केल्यामुळे अवघ्या तीन महिन्यात तिचा आणि अपूर्वचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या.

यावर आता तिने मौन सोडलं असून फोटो डिलीट करण्यामागचं कारण तिने इंस्टाग्राम स्टोरीमधून शेअर केलं.

दिव्याची पोस्ट

दिव्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या घटस्फोटाविषयीच्या चर्चा करणाऱ्यांची कानउघाडणी केली. दिव्याने लिहिलं,"मी काहीच बोलले नाही. मी कोणतीही कमेंट किंवा स्टोरी पोस्ट केलेली नाही. मी २५०० पोस्ट डिलीट केल्या. तरीही मीडियाने फक्त लग्नाचे फोटो न दिसण्यावरच प्रतिक्रिया दिली. लोक माझ्याकडे कसे पाहतात आणि माझ्याकडून त्यांना काय अपेक्षित आहे, हेजाणून घेणं रंजक आहे. मी नेहमी तेच केलं जे लोकांना माझ्याकडून अपेक्षित नव्हतं. आणि आता त्यांच्या काय अपेक्षा आहेत तर – घटस्फोट किंवा बाळ? खरं तर यापैकी काहीही नाही.

खरं म्हणजे माझ्या प्रोफाइलवर पिन केलेल्या पहिल्या पोस्टवरच यापुढे मला बोलायचं आहे. प्रत्येक कथेचा शेवट आनंदी असतो आणि देवाच्या कृपेने माझा नवरा माझ्या शेजारी शांतपणे झोपला आहे आणि घोरतोय. "

Divya Agarwal post

नेमकं काय आहे प्रकरण?

काल अचानक दिव्या आणि अपूर्वच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या लग्नाचे आणि इतर फोटोज डिलीट करण्यात आले. फक्त त्यांच्या काही पार्टनरशिपचे फोटो दिसत होते. यावरून दिव्या आणि अपूर्वचा घटस्फोट होणार आहे अशा चर्चा सुरु झाल्या.

दिव्या-अपूर्वचं सरप्राईज वेडिंग

दिव्या अगरवाल आणि तिचा बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकर यांनी २० फेब्रुवारी २०२४ रोजी अभिनेत्रीच्या चेंबूर येथील घरी लग्नगाठ बांधली होती. दिव्या व अपूर्व यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे अनेक फोटो शेअर केले होते. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची खूप चर्चा होती.

या आधी दिव्या वरुण सूदला डेट करत होती पण त्यांचा ब्रेकअप झाल्यावर तिला खूप ट्रोल करण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anand Paranjpe Sharad Pawar Meeting : पक्ष प्रवेश एकनाथ शिंदेंच्या पक्षात, भेट घेतली शरद पवारांची; ठाणेकर आनंद परांजपेंच्या भेटीने चर्चांणा उधाण

'सिंगल फादर असल्यानं मुलीच्या मैत्रिणी घरी येत नाही' इमरान खान म्हणाला, 'त्यांच्या आई वडिलांना माझ्याकडे मुलींना पाठवायला भिती...'

Kalyan Crime: कल्याण रेल्वे यार्डात मुलीवर अत्याचार; आरोपीला काही तासांत अटक, मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला अन् काय घडलं!

Pune : शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा भीषण अपघात, फॉर्च्युनरची रिक्षाला धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

'बालिका वधू'च्या गहनाने १० रुपयांच्या वस्तूपासून बनवला ब्रँड; कमावतेय कोट्यवधी, तुमच्याही घरात असेलच, काय आहे ती वस्तू?

SCROLL FOR NEXT