Gayatri Datar and Payal Jadhav's New Serial 
Premier

Abeer Gulal : वर्णद्वेषाची गोष्ट सांगणार 'अबीर गुलाल' ; गायत्री दातारचा दमदार कमबॅक !

Actress Gayatri Datar's new serial promo released : अभिनेत्री गायत्री दातार 'अबीर गुलाल' या कलर्स मराठीवरील नवीन मालिकेतून कमबॅक करतेय. सोशल मीडियावर या मालिकेचा प्रोमो चर्चेत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Colors Marathi New Serial : कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच सुरु होणाऱ्या 'अबीर गुलाल' (Abeer Gulal) या नव्या मालिकेची चर्चा सगळीकडे सुरु आहे. दोन मुलींची जन्मतःचं ताटातूट झाल्याचं या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलंय. फक्त रंगामुळे दोन मुलींचं नशीब कसं बदलतं याची गोष्ट या मालिकेत पाहायला मिळणार आहे. नुकतंच या मालिकेत कोण अभिनेत्री काम करणार आहेत हे नव्या प्रोमोमधून रिव्हील करण्यात आलं.

कलर्स मराठी वाहिनीच्या सोशल मीडियावर 'अबीर गुलाल' मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला. या प्रोमोमध्ये सावळ्या रंगामुळे वडिलांचा राग सहन करणारी श्री आणि काळा रंग सहनही न करणारी, श्रीमंतीत वाढलेली शुभ्रा यांची गोष्ट या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

शुभ्रा रंगाने गोरी असून तिच्या आईवडिलांची लाडकी आहे पण, ती त्यांच्या वर्णामुळे त्यांच्यासोबत वाईट वागतेय तर, दुसरीकडे श्रीच्या घरी सगळे गोरे असल्यामुळे तिचे वडील सतत तिचा अपमान करतात आणि ती मरून जावी अशी इच्छा व्यक्त करतात असं दाखवण्यात आलं आहे. मालिकेचा हा प्रोमो चर्चेत असून अभिनेत्री पायल जाधव (Payal Jadhav) 'श्री' आणि गायत्री दातार (Gayatri Datar) 'शुभ्रा' ही भूमिका साकारणार आहे.

पहा प्रोमो:

अनेकांनी मालिकेच्या प्रोमोवर कमेंट करत त्यांना प्रोमो आवडल्याचं म्हंटलं. गायत्रीच्या चाहत्यांनी प्रोमोवर कमेंट करत ते तिला या मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत असं म्हणाले. 'बापल्योक' फेम अभिनेत्री पायल जाधव या मालिकेद्वारे मालिकाविश्वात पदार्पण करतेय.

लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून ही मालिका कोणत्या वेळेत प्रसारित होणार आणि कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे अजून कलर्स मराठी वाहिनीकडून स्पष्ट करण्यात आलं नाहीये.

गायत्रीच्या कारकिर्दीवर एक नजर

अभिनेत्री गायत्री दातार बऱ्याच काळाने मालिकेत दिसणार आहे. या आधी तिने स्टार प्रवाहवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत काम केलं होतं. या मालिकेत तिने निगेटिव्ह भूमिका साकारली होती.

गायत्रीने 'तुला पाहते रे' या झी मराठीवरील मालिकेतून मालिकाविश्वात पदार्पण केलं होत. सुबोध भावे यांच्यासोबतची तिची ही मालिका खूप गाजली होती. या बरोबरच कलर्स मराठीवरील 'बिग बॉस मराठी सीजन ३' मध्येही गायत्री सहभागी झाली होती. बिग बॉसच्या घरातील तिचा वावर चांगलाच चर्चेत होता. काहींनी तिचं कौतुक केलं होतं तर काहींनी तिच्यावर टीका केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT