Hina Khan Special Post For Her Fans Esakal
Premier

Hina Khan: "तुम्ही देवाला माझ्यासाठी साकडं घातलं..." ; चाहत्यांचे आभार मानताना हिना झाली भावूक

Hina Khan Cancer Update; Post For Her Fans: अभिनेत्री हिना खानने तिच्या चाहत्यांचे आणि तिला सहकार्य करणाऱ्या सगळ्या पत्रकारांचे आभार मानले.

सकाळ डिजिटल टीम

Hina Khan Cancer Update: अभिनेत्री हिना खान कॅन्सर या रोगाचा सामना करतेय. काही दिवसांपूर्वीच तिला स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं निदान झालं. सोशल मीडियावर तिने या विषयीची बातमी शेअर केली होती. तिने शेअर केलेल्या या धक्कादायक बातमीनंतर तिच्या अनेक चाहत्यांनी ती लवकरात लवकर बरी व्हावी असं देवाला साकडं घातलं होतं. नुकतंच हिनाने पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांचे आभार मानले.

हिनाची पोस्ट

इंस्टाग्रामच्या स्टोरी फिचरचा वापर करत हिनाने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. त्यात ती म्हणते,"सगळ्यांना नमस्कार, मी खरंच खूप भाग्यवान आहे कि मला तुमच्या सगळ्यांचं इतकं प्रेम मिळतंय आणि खरं सांगायचं तर मला अजिबात कल्पना नाही कि इतकं प्रेम मिळवण्यासाठी मी खरंच योग्य व्यक्ती आहे का ? तुमच्या या दयाळूपणासाठी माझं मन भरून आलं आहे.

मनोरंजन विश्व ते पत्रकार, क्रीडाक्षेत्रातील मान्यवर ते शिक्षक, कंपनीतील अधिकारी ते डॉक्टर्स, गृहिणी अशा सगळ्या क्षेत्रातील लोकांनी माझ्याशी संपर्क साधत मला खूप प्रेम आणि आशीर्वाद दिले. यातील अनेकजण मला ओळखतही नाहीत. अनेकांना मी कोण आहे हे सुद्धा माहित नाही तरीही तुम्ही माझ्याशी संपर्क केलात. "

पुढे ती म्हणाली,"माझे व्हाट्सअप आणि इंस्टाग्राम अकाऊंट्स तुमच्या मेसेजने भरले आहेत. तुम्ही दिलेलं हे भरभरून प्रेम पाहून मी भावूक झालेय. जसा मला वेळ मिळेल तसा मी प्रत्येक मेसेजला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतेय पण हे थोडं कठीण आहे आणि यात थोडा जास्त वेळ लागतोय.

या आधी कॅन्सरचा सामना केलेल्या व्यक्तींकडून मला मिळणारा आधार खरंच खूप महत्त्वाचा आणि भावनिक आहे. मी तुम्ही केलेली ही मदत, दिलेला आधार, प्रेम कधीतरी कसं परत करू ?

मी खूप कृतज्ञतेने आणि नम्रतेने सांगते कि तुम्ही दिलेल्या आशीर्वादांसाठी मी खूप आभारी आहे. तुम्ही दिलेला आशीर्वाद मी मनापासून हात जोडून स्वीकारला आहे आणि माझ्यासारखा आशीर्वाद प्रत्येकाला लाभो अशी मी देवाजवळ प्रार्थना करते. मी हे सगळं नक्की ज्याला कुणाला गरज असेल त्याला परत करेन आणि चांगलं काम करेन असं वचन देते. हे चक्र असंच सुरु राहावं आणि यात अधिकाधिक लोकं जोडली जावीत अशी आशा करूया."

Hina Khan Post

"आणि अखेर, माझे सगळे प्रेमळ चाहते खरंच मी तुमचे कितीही आभार मानले तरीही कमी आहे. जगातल्या प्रत्येक कोपऱ्यातून राहणाऱ्या माझ्या चाहत्यांचे मी आभार मानते. तुम्ही दिलेलं प्रेम आणि आधार खरंच खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी मी कृतज्ञ आहे आणि तुम्ही माझ्यासाठी करत असलेल्या छोट्या छोट्या गोष्टी जसं कि, देवाकडे प्रार्थना करणं, रोज मला छान मेसेजेस आणि फुलं पाठवणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.

काहीजण दर्ग्यात गेले तर काहींनी माझ्यासाठी रोजे ठेवले. काहींनी उपवास केले, व्रत केले तर काहींनी नवसही केले आहेत. काहींनी मला देवाची प्रतीक पाठवली, होम-हवन केले. तुम्ही तुमच्या धार्मिक स्थळांना भेटी देऊन माझ्यासाठी प्रार्थना केली. तर काहींनी त्यांच्या ठिकाणी असलेल्या मोठ्या मंदिरांना, दर्ग्यांना भेट देत माझ्यासाठी प्रार्थना केली. हे सगळे व्हिडीओज पाहून माझे डोळे भरून आले. तुम्ही माझ्यासाठी करत असलेल्या गोष्टी पाहून मी खरंच खूप कृतज्ञ आहे. "

"मी हे सगळं शब्दात मांडू शकत नाही कि हे माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे. या जगात राहत असलेलं माझं लाखोंच्या घरात असलेल्या कुटूंबाचे मनापासून बहार जे माझ्यासाठी खूप प्रार्थना करत आहेत. हे आयुष्य बदलवून टाकणार आहे. खूप खूप प्रेम" असं म्हणत तिने तिच्या चाहत्यांचे आभार मानले.

हिना सध्या किमोथेरपी घेत असून तिच्या कॅन्सरवर उपचार सुरु आहेत आणि ती त्याचे अपडेट्स चाहत्यांपर्यंत पोहोचवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT