actress prarthana behere sakal
Premier

Prarthana Behere : 'म्हणून, आम्ही मूल होऊ दिलं नाही', प्रार्थनाने सांगितलं कारण

माझी तुझी रेशीमगाठ या झी मराठीवरील मालिकेमुळे प्रार्थना बराच काळ चर्चेत होती. ‘पवित्र रिश्ता’ सारख्या गाजलेल्या मालिकेतून पदार्पण केलेल्या या अभिनेत्रीने मराठी इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख मिळवलीये.

सकाळ वृत्तसेवा

माझी तुझी रेशीमगाठ या झी मराठीवरील मालिकेमुळे प्रार्थना बराच काळ चर्चेत होती. ‘पवित्र रिश्ता’ सारख्या गाजलेल्या मालिकेतून पदार्पण केलेल्या या अभिनेत्रीने मराठी इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख मिळवलीये. ‘कॉफी आणि बरंच काही’ हा तिचा सिनेमाही खूप गाजला. सोशल मीडियावरसुद्धा प्रार्थना खूप प्रसिद्ध असून तिचे फोटोशूट्स कायमच चर्चेत असतात. प्रार्थनाने एका वर्षापूर्वी मुंबई शहर सोडलं असून ती आता तिच्या कुटूंबासोबत कायमची अलिबागला शिफ्ट झालीये. यामागचं कारण तिने एका मुलाखतीत शेअर केलं.

प्रार्थनाने नुकतीच सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिला तिने मुंबई सोडून अलिबागला जाण्याचा का निर्णय घेतला या प्रश्नाचं उत्तर दिलं. ती म्हणाली,' अलिबागला आमची जागा खूप पूर्वीपासून होती. माझ्या नवर्याच्या अभिच्या आजोबांची होती. कोव्हिडच्या दोन वर्षं आधी आम्ही ठरवलं कि ती जागा आपण डेव्हलप करूया.

त्यानंतर रो-रो बोट सुरु झाली. तिथे घोडे, कुत्रे असे प्राणी आम्ही खूप पाळले आहेत. त्यामुळे अभिला आठवड्यातून चार दिवस तिथे जावं लागायचं. मी तेव्हा जुहूला राहायचे. माझी त्यावेळी मालिका सुरु होती त्यामुळे मला इथेच राहावं लागायचं. त्यामुळे मग आम्ही ठरवलं कि आपण शिफ्ट होऊया. पण, त्यानंतर असं वाटायचं अरे मुंबईत तशी मजा नाही.

सतत गर्दी, वाहतूक कोंडी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं यामुळे स्वत:ला कुठेतरी वेळ देता येत नव्हता. त्यामुळे अलिबाग जाऊन समाधान मिळेल असं आम्हाला वाटलं. यामुळेच आम्ही कायमस्वरुपी तिथे शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. मुंबईहून अलिबागला राहण्यासाठी माझे सासू-सासरे सुद्धा तयार झाले.

त्या वातावरणात त्यांचं आयुष्य आणखी वाढलंय असं मला वाटतं. ते दोघे सुद्धा तिथे सुखी आहेत. तिथे मी मेकअपशिवाय फिरू शकते, झाडांची काळजी घेते. माझी पेंटिग्जची आवड जपते. प्रवासाच्या दृष्टीने थोडासा त्रास झाला पण पण आता सवय झालीये. आता काहीच वाटत नाही. आम्हाला आता एक वर्ष पूर्ण होईल.”

हे सांगताना तिने तिच्या मूल होऊ न देण्याच्या निर्णयावर भाष्य केलं. 'मला कायमच मूल नको होत त्याऐवजी मला खूप पेट्स हवे होते. जेव्हा माझं अभीशी लग्न ठरलं तेव्हा त्याचीही हीच इच्छा असल्याचं मला समजलं आणि आम्ही मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला आणि आता आम्ही आमच्या या मुलांची काळजी घेतोय आणि यासाठी आमच्या कुटूंबाचा पूर्ण पाठींबा होता.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja: हिंदु-मुस्लिम ऐक्याचा संदेश! लालबागचा राजा मशिदीजवळ पोहोचतो तेव्हा...; पाहा ऐतिहासिक क्षणाचा खास व्हिडिओ

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेने पुढे जातोय

उत्साहाला गालबोट! पुण्यात ४ तर शहापूरमध्ये ५ जणांचा मृत्यू, कोल्हापूरसह सांगलीत मिरवणुकीत वाद... विसर्जनादरम्यान कुठं काय घडलं?

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

SCROLL FOR NEXT