Premier

Rasika Sunil: अभिनेत्री रसिका सुनील या चित्रपटात साकारणार खलनायिकेची भूमिका

Marathi New Movie: अभिनेत्री रसिका सुनीलने आपला मोठा चाहतावर्ग तयार केला आहे.चित्रपट १९ जुलै रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Marathi Latest News: छोट्या आणि मोठ्या पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारत अभिनेत्री रसिका सुनीलने आपला मोठा चाहतावर्ग तयार केला आहे. तसेच ती आता आगामी ‘डंका... हरिनामाचा’ या चित्रपटातही ती डॅशिंग भूमिका साकारणार आहे. नुकतंच तिचं पोस्टर प्रदर्शित झाले असून त्यात ती डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे.

यामध्ये ती झाशा ही भूमिका साकारत असून ती खलनायिका म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या भूमिकेबद्दल बोलताना रसिकाने सांगितलं की, ‘ही अतिशय भन्नाट व्यक्तिरेखा आहे. ग्रे शेड असलेली भूमिका करताना मेकअप, बॉडी लँग्वेज, एक्स्प्रेशन्स याकडे खास लक्ष द्यावं लागतं’. भूमिका कोणत्याही प्रकारची असली, तरी ती चांगली व्हावी, यासाठी कष्ट घ्यावे लागतात.

दरम्यान रुद्र एंटरटेन्मेंट स्टुडिओज् आणि गणराज स्टुडिओज् प्रस्तुत ‘डंका... हरिनामाचा’ या चित्रपटाची निर्मिती रवींद्र फड यांनी केली असून लेखन आणि दिग्दर्शन श्रेयश जाधव यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, अक्षया गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, किरण भालेराव, कबीर दुहान सिंग, महेश जाधव यांच्यादेखील भूमिका असणार आहेत. हा मराठी चित्रपट १९ जुलै रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Petrol Explosion: पेट्रोलच्या भडक्यात भाजलेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

Sharad Pawar : शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली चुकीची, शरद पवार यांचे मत; सरकारने निर्णयाचा फेरविचार करावा

SCROLL FOR NEXT