Actress Rekha Rana Interview  sakal
Premier

Actress Rekha Rana Interview : स्‍त्रियांवरील अत्‍याचारावर आधारित कथानक

स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांवर आधारित असलेला कुमार राज दिग्दर्शित ‘अमीना’ हा चित्रपट येत्या १२ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री रेखा राणा यांची प्रमुख भूमिका असून या चित्रपटात एका धाडसी स्त्रीची कथा मांडण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुलाखत

- रेखा राणा

स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांवर आधारित असलेला कुमार राज दिग्दर्शित ‘अमीना’ हा चित्रपट येत्या १२ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री रेखा राणा यांची प्रमुख भूमिका असून या चित्रपटात एका धाडसी स्त्रीची कथा मांडण्यात आली आहे. या निमित्ताने रेखा राणा यांच्याशी केलेली खास बातचीत....

संतोष भिंगार्डे

अभिनायची आवड कशी निर्माण झाली?

- अभिनयाची आवड मला लहानपणापासूनच होती. म्हणजे कुठलेही एखादे गाणे बघितले की मी त्यावर डान्स करायचे. माझ्या कुटुंबालादेखील ते आवडायचे आणि तेदेखील मला खूप प्रोत्साहन द्यायचे. त्यामुळे अभिनय आणि नृत्याची आवड मला लहानपणापासून होती. त्यावेळीच मी अभिनयामध्ये करिअर करायचे असे ठरवले होते. माझे शिक्षण दिल्लीत झाले असून अभिनयामध्ये करिअर करण्यासाठी येथे आले.

अभिनयासाठी तुम्ही कुठले प्रशिक्षण घेतले आहे का?

- न्यूयॉर्क फिल्म अॅकॅडमीमधून मी अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. मी बेरी जॉन यांची विद्यार्थिनी आहे. त्यांनी मला खूप काही शिकविले.

पहिल्यांदा कॅमेऱ्याचा सामना करतानाचा तुमचा अनुभव कसा होता?

- मी थिएटरमध्ये अनेक वेळा काम केले आहे. त्यामुळे मला त्यावेळेस एवढी भीती वाटली नाही. मी अभिनय करू शकते, असा मला आत्मविश्वास होता. त्यामुळे मी अजिबात घाबरले नाही. अनेक नवीन गोष्टी मला त्यावेळी शिकता आल्या. आताही काही गोष्टी नव्याने शिकत आहे.

या चित्रपटातील तुमच्या भूमिकेबद्दल तूम्‍ही काय सांगाल?

- या चित्रपटात माझी दुहेरी भूमिका आहे. एक मीना आणि दुसरी अमीना. मीना ही ‘अमीना’ या नाटकात अमीनाची भूमिका साकारत असते. एकीकडे मीनाचा प्रवास तर, दुसरीकडे अमीनाचा प्रवास गुंफण्यात आला आहे. ही एका तरुणीची गोष्ट आहे. तिच्यावर आलेल्‍या कठीण परिस्‍थितीला ती खूप धाडसाने सामोरी जाते. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांवर आधारित हा चित्रपट आहे. हा माझा पाचवा चित्रपट आहे.

तुम्‍हाला हा चित्रपट कसा ऑफर झाला?

- खरं तर हे एक प्रसिद्ध नाटक आहे. ‘अमीना यहां बिकती हैं’ हे नाटक आफताब हसनैन यांनी लिहिले आहे. ते खूप प्रसिद्ध लेखक आहेत. यात माझी ‘अमीना’ नावाची भूमिका होती. त्यावेळेस सराव सुरू असताना या नाटकाबद्दल कुमार राज यांना समजले. त्‍यांना कथा खूप आवडली आणि त्‍यांनी या नाटकावर आधारित चित्रपट बनवायचा निर्णय घेतला. हे सगळं सुरू असताना मीदेखील या चित्रपटाशी जोडली गेली.

कोणते दृश्‍य करताना खूप आव्हान वाटले?

- या चित्रपटाचे चित्रीकरण भारताबरोबरच लंडन, दुबई, अबूधाबी, अमेरिका, दक्षिण आफ्रिका या ठिकाणी झाले आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये चित्रीकरण सुरू असताना मला खूप भीती वाटली होती. तिथे दोन वाघांसमोर मला चित्रीकरण करायचे होते. आमच्या सिनेमॅटोग्राफरनी आणि दिग्दर्शकांनी मला खूप मदत केली. दोन वाघ समोरून येतात आणि मी त्यांच्यासमोरून जाते, असे चित्रीकरण होते. त्‍यावेळी मला खूप भीती वाटली होती.

अनंत महादेवन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?

- अनंत महादेवन यांचीही खूप महत्त्वाची भूमिका या चित्रपटात आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. खूप काही शिकायला मिळाले. त्यांचा स्वभाव खूप छान आहे.

आता तुम्‍ही अमेरिकेमध्ये राहात आहात. तेथे धार्मिक गोष्टींवर काम सुरू आहे. आता एखाद्या मोठ्या चित्रपटात संधी मिळाल्‍यास करणार का?

- मी माझ्या अटी व शर्तीनुसार काम करणार आहे. पण, माझे पहिले प्राधान्य माझ्या तेथील कामाला असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Fraud: 'सोलापुरातील महिला डॉक्टरची १७ लाखांची ऑनलाइन फसवणूक'; संशयित आरोपी राजस्थान, दिल्लीतील

B.Ed student set herself on fire: खळबळजनक! विभागप्रमुखाच्या लैंगिक छळाने त्रस्त बी.एडच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल; भर कॉलेजमध्येच स्वतःला घेतलं पेटवून

IND vs ENG 3rd Test: रिषभला जसं बाद केलं तसंच करायला गेले, पण सहावेळा तोंडावर आपटले; इंग्लंडची चूक भारताच्या पथ्यावर Video

Pune News: माेठी बातमी! 'संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा'; पुरंदर-हवेली मतदारसंघात खळबळ

Latest Marathi News Updates : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग मिसिंग लिंक प्रकल्प'; महाराष्ट्रातील अभियांत्रिकी चमत्कार - फडणवीस

SCROLL FOR NEXT