richa chadha baby girl  sakal
Premier

Richa Chadha-Ali Fazal: रिचा चड्डा अली फझलच्या घरी हलला पाळणा! अभिनेत्रीने दिला गोंडस मुलीला जन्म; पोस्ट शेअर करत दिली माहिती

Richa Chadha Ali Fazal Baby Girl: लोकप्रिय अभिनेत्री रिचा चड्डा हिने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्यांनी एक पोस्ट शेअर करत ही बातमी दिली आहे.

Payal Naik

बॉलिवूडमधील स्टार कपल अभिनेत्री रिचा चड्डा आणि अभिनेता अली फझल आई बाबा झाले आहेत. त्यांना कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. अभिनेत्रीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर करत ही बातमी दिली. रिचाने १६ जुलै रोजी एका मुलीला जन्म दिला. त्यांनी आपला आनंद चाहत्यांसोबतही शेअर केला आहे. आता चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. रिचा आणि अली यांनी फेब्रुवारी महिन्यात आपण आई- बाबा होणार असल्याचं सांगितलं होतं आता त्यांनी एका गोंडस बाळाचं स्वागत केलं आहे.

अली फझल आणि रिचा चड्डा यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. त्यांनी एक स्टोरी पोस्ट करत लिहिलं, 'आम्ही तुम्हाला हे सांगताना खूप आनंदी आहोत की आमच्या घरी १६ जुलै २०२४ रोजी एका गोंडस आणि आरोग्यदायी मुलीचं आगमन झालं आहे. आमच्या कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला आहे. आम्ही आमच्या हितचिंतकांचे आणि चाहत्यांचे त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादासाठी आभार मानतो. खूप खूप प्रेम.' त्यांच्यावर आता चाहत्यांच्या शुभेच्छांचा पाऊस पडत आहे.

१४ जुलै रोजी रिचाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपण आपल्या चिमुकल्या पाहण्याची वाट पाहत आहोत असं म्हटलं होतं. रिचा आणि अली यांनी २०२० मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांच्याकामाबद्दल सांगायचं तर रिचा शेवटची 'हिरामंडी' या संजय लीला भन्साळी यांच्या वेबसीरिजमध्ये दिसली होती. तर अली 'मिर्झापूर ३' मध्ये दिसला होता. अलीच्या अभिनयाचं आणि भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mehbooba Mufti Statement : ‘’लडाख, POKमध्ये Gen-Z… ’’ ; मेहबूबा मुफ्तींनी केलं मोठं विधान!

Gautami Patil News : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार? ; पुणे पोलिसांनी बजावली नोटीस!

IND vs AUS: विराट कोहली आणि रोहित शर्माचे पुनरागमन होणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कधी? तारीख आली समोर

Prakash Ambedkar : भाजप, आरएसएसच्या विचारसरणीत ‘मदत’ हा शब्दच नाही; ‘वंचित’चे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका

Pune News : महापालिकेची प्रभाग रचना सोमवारपर्यंत जाहीर होणार

SCROLL FOR NEXT