Chandu Champion Esakal
Premier

Chandu Champion : "रडून रडून माझी अवस्था वाईट झाली"; चंदू चॅम्पियनचं शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी केलं भरभरून कौतुक

Shabana Azmi's reaction on Chandu Champion : सेलिब्रिटी कपल जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनी कार्तिक आर्यनच्या चंदू चॅम्पियन सिनेमाचं भरभरून कौतुक केलं.

सकाळ डिजिटल टीम

Chandu Champion Celebrity Reaction : अभिनेता कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असलेल्या चंदू चॅम्पियन या सिनेमाची चर्चा सध्या सगळीकडे रंगलीये. चंदू समीक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडून सिनेमाचं कौतुक होतंय. अगदी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजनेही या सिनेमाचं कौतुक केलं आहे. नुकतंच बॉलिवूड मधील सेलिब्रिटी जोडी ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांनी या सिनेमाचं भरभरून कौतुक केलं.

कार्तिकचं केलं भरभरून कौतुक

नुकतंच शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी कार्तिकचा चंदू चॅम्पियन सिनेमा सिनेमागृहात पहिला. सिनेमागृहातून बाहेर येत असताना त्यांना पापराजींनी पाहिलं. त्यांनी त्यांना सिनेमा कसं वाटला असं विचारताच त्यांनी कार्तिक आणि सिनेमाचं भरभरून कौतुक केलं. "हा सिनेमा खूपच सुंदर आहे. सिनेमाची कथा खूप उत्तम आहे. इंटरव्हलनंतरचा भाग खूप उत्तम झालाय. रडून रडून माझी अवस्था वाईट झाली." असं त्या म्हणाल्या. त्यांच्याबोरोबर जावेद अख्तर यांनी या सिनेमाचं कौतुक केलं.

समीक्षकांकडून कौतुक

सिनेमा रिलीज झाल्यापासून समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव केलाय. आयएमडीबीवर या सिनेमाला 10 पैकी 8.8 इतकं रेटिंग दिल आहे टीआर रोट्न टोमॅटोजवर सिनेमाला 100% रिव्हयुज मिळाले आहेत. तर अनेक वृत्तपत्रांनी आणि चित्रपट समीक्षकांनी दिग्दर्शक कबीर खान आणि कार्तिक आर्यनचं भरभरून कौतुक केल आहे.

हा सिनेमा पॅरालिम्पिक विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या आयुष्यावर आधारित आहे. अपंगत्वावर मात करून त्यांनी स्पर्धेत मिळवलेलं विजेतेपद याची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. कार्तिक आर्यनने या सिनेमासाही बरीच मेहनत घेतली असून त्याने बरंच वजन कमी केलं आहे तर कबीर खान यांनीही '83' च्या अपयशानंतर डिप्रेशनमधून सावरत हा सिनेमा बनवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Devang Dave: कोण आहेत देवांग दवे? विजय वडेट्टीवारंनी काय आरोप केले? निवडणूकीपूर्वी भाजप अडचणीत येणार?

Wai Voter list: 'वाईतील प्रारूप मतदार यादीत गंभीर चुका'; काँग्रेससह भाजप, राष्ट्रवादी पक्षाने घेतली हरकत..

खुनशी हसू आणि थरार ! आम्ही दोघीनंतर प्रिया-मुक्ताचा नवा सिनेमा; पोस्टर चर्चेत

Uddhav Thackeray : 'इलेक्शन ऐवजी थेट सिलेक्शन करा'! निवडणूक आयोगाने घातलेल्या गोंधळावर उद्धव ठाकरे वैतागले

Man With 1638 Credit Cards: बापरे! या माणसाकडे आहेत तब्बल 1,638 क्रेडिट कार्ड्स; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झालीये नोंद!

SCROLL FOR NEXT