Sharmin and Sanjeeda Esakal
Premier

Heeramandi : संजय यांच्या भाचीने केला संजिदाचा Outsider म्हणून अपमान; अभिनेत्रींमधील शीतयुद्ध होतंय व्हायरल

अभिनेत्री शर्मीन सेगलने अभिनेत्री संजिदा शेखचा आउटसायडर म्हणत अपमान केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

संजय भन्साळी दिग्दर्शित हिरामंडी ही वेबसिरीज खूप चर्चेत आहे. नेटफ्लिक्सवर गाजत असलेल्या या वेबसिरीजमधील कलाकारांच्या मुलाखती सोशल मीडियावर गाजत असतानाच अभिनेत्री शर्मीन सेहगल आणि अभिनेत्री संजिदा शेख यांच्यातील शीतयुद्धाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

काय घडलं नेमकं?

एका मुलाखतीमध्ये संजिदाने संजय यांचं कौतुक करताना म्हंटलं कि," ते परफेक्शनिस्ट आहेत. त्यांना सगळं साधारण दिसलेलं आवडत नाही ते जे काही करतात ते सर्वोत्तम असतं. ते त्यांच्या कलेप्रति असलेल्या प्रामाणिकपणासाठी आणि सर्जनशीलतेसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे काम करणाऱ्या कलाकारानेही काम करताना तितकंच प्रामाणिकपणे काम करावं अशी त्यांची अपेक्षा आहे. म्हणून, मला त्यांची सगळी रूपं आवडतात."

आता संजिदाचं उत्तर पूर्ण व्हायच्या आतच शर्मीनने तिला मध्येच थांबवलं आणि म्हणाली," मला वाटतं संजय भन्साळी यांच्यासाठी परफेक्शनिस्ट हा शब्द खूप सामान्य आहे. हा एक असा शब्द आहे जो फक्त त्यांच्यासोबत कधीही काम न केलेली इंडस्ट्रीबाहेरील व्यक्ती जर त्यांच्या सेटवर आली आणि तिने काम केलं तर वापरेल. पण ते याही पेक्षा जास्त आहेत. ते प्रत्येक बदल स्वीकारतात. ते स्वतःला प्रत्येकवेळी वेगळ्या पद्धतीने आव्हान देतात आणि हे सगळं फक्त परफेक्शनमधून येत नाही. ते खरेपणा, उत्स्फूर्तता आणि जादू शोडतात. जर ते फक्त परफेक्शनिस्ट असते तर त्यांनी उत्स्फूर्तता अशी दाखवली नसती जसे ते आता दाखवतात."

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

या व्हिडिओमध्ये शर्मीन संजिदाचा एकप्रक्रारे आउटसायडर म्हणून अपमान करतेय असं वाटतंय. नेटकऱ्यांनीही तिच्या या वागण्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना तिची प्रतिक्रिया आवडली नसून ती खूपच गर्विष्ठ आहे असं म्हंटलं आहे. दरम्यान संपूर्ण व्हिडिओमध्ये शर्मीनच्या उत्तरावर संजिदाने प्रतिक्रिया दिली नसली तरीही तिची चेहऱ्यावरची नाराजी लपून राहत नाही.

अदिती राव हैदरीबरोबरही बेबनाव

या आधीच्या नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या मुलाखतीत शर्मीनचा अदिती राव हैदरीबरोबरही मतभेद झाल्याचं दिसून आलं.

कलाकार असुरक्षित असतात कि नाही यावरून सगळेजण त्यांचं मत देत होते. त्यावेळी अदितीने एखाद्या कलाकारांविषयी असुरक्षित वाटणं ही खूप चुकीची गोष्ट आहे असं म्हंटलं त्यावर शर्मीनने लगेच तिला तोडत त्यात काहीच चुकीचं नाहीये. कलाकार असुरक्षित असतात. त्यात काहीच चुकीचं नाहीये असं उत्तर दिलं. तिच्या उद्धटपणामुळे अदिती नाराज झाली. तिच्या चेह-यावर नाराजी स्पष्टपणे दिसत होती. सोशल मीडियावर हाही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

दरम्यान, १ मे ला रिलीज झालेल्या या वेबसीरिजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. अनेकांनी या वेबसिरीजचं सोशल मीडियावर कौतुक केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Nagar Parishad Election : बारामतीत जय पवार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याची मागणी......

Train food vendor beat passenger Video : ‘’जेवण फार महाग आहे’’, एवढंच म्हटलं तर प्रवाशाला रेल्वेतच विक्रेत्यांनी पट्टा काढून बेदम मारलं!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने सर जे. जे. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना नोटीस बजावली

पिंम्पल्स असलेली हिरोईन आम्ही का पाहायची... शिवानीला झालेल्या ट्रोलिंगवर अमित म्हणतो- तिच्या चेहऱ्यावर लिच लावले...

Tomorrow Horoscope Prediction : उद्या तयार होतोय अत्यंत शुभ सर्वार्थ सिद्धी योग, 5 राशींवर भगवान विष्णूची कृपा

SCROLL FOR NEXT