Shivani Surve Wedding in Serial Esakal
Premier

Shivani Surve Wedding : शिवानी सुर्वे पुन्हा अडकणार लग्नबंधनात ! नववधूच्या वेषातील फोटो केले शेअर ; काय घडलं नेमकं ?

Shivani Surve wedding look went viral : अभिनेत्री शिवानी सुर्वेचे नववधूच्या वेशातील फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. पण काय घडलं आहे नेमकं जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Star Pravah New Serial : मराठी मधील आघाडीची अभिनेत्री शिवानी सुर्वे काही महिन्यांपूर्वीच लग्नबंधनात अडकली. अभिनेता अजिंक्य ननावरेशी तिने लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर तिच्या लग्नाची बराच काळ चर्चा होती. त्यातच तिचे पुन्हा नववधूच्या वेशातील फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे ती पुन्हा लग्न करतेय का ? अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. शिवानीचं लग्न होतंय पण मालिकेमध्ये. सध्या शिवानी स्टार प्रवाहवरील 'थोडं तुझं थोडं माझं' या मालिकेत काम करतेय आणि या मालिकेत ती साकारत असलेल्या मानसी या पात्राचं लवकरच लग्न होणार आहे.

मानसीने आजवर स्वत:च्या आनंदाचा कधीही विचार केला नाही. इतरांच्या आनंदासाठी आपण मन मारुन जगतोय हेही तिच्या लक्षात येत नाही. वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं हेचं मानसीचं ध्येय आहे. तिने स्वत:साठी कधी स्वप्नं पाहिलंचं नाही. त्यामुळेच प्रेम काय लग्नानंतरही होईल असं तिचं मत आहे. त्यामुळेच वडिलांच्या इच्छेखातर शिक्षणाचं स्वप्न अर्धवट सोडून ती लग्न करायला टायर झाली आहे आपण हे लग्न तिच्या आयुष्याला कलाटणी देणार आहे.

मानसीच्या बाबांनीही आपल्या मुलींसाठी खूप स्वप्न पाहिली आहेत. वीट भट्टीतला कामगार ते वीटभट्टीचा मालक हा संघर्ष मानसीच्या बाबांनी अनुभवला आहे. त्यामुळे आपण जे भोगलं ते आपल्या मुलींच्या वाट्याला येऊ नये असं त्यांना वाटतं. म्हणूनच आपल्यापेक्षाही श्रीमंत असलेलं खानदानी स्थळ त्यांनी मानसीसाठी शोधलं आहे. आपल्या बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मानसी रणजीतसोबत लग्न करण्यास तयार झालीय. पण हे लग्न होणार का कि मानसीच्या आयुष्यात नवीन वादळ येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हिरव्या रंगाची साडी, अंगावर दागिने, मुंडावळ्या या लूकमध्ये शिवानी खूप सुंदर दिसतेय. लग्नासाठी तिने केलेला हा लूक तिच्यावर शोभून दिसतोय. मानसी आणि रणजितचं लग्न या आठवड्यात स्टार प्रवाहवर पार पडणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका 'थोडं तुझं थोडं माझं' ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Shivani Surve

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT