Sharddha Kapoor  Esakal
Premier

Sharddha Kapoor & Rahul Modi : 'दिल रख ले पर नींद तो वापस दे दे यार' ; अखेर श्रद्धाने दिली राहुल बरोबरच्या रिलेशनशिपची कबुली ?

Shraddha confirms her relationship with Rahul Modi: अभिनेत्री श्रद्धा कपूरने सोशल मीडियावर राहुल मोदीबरोबरचा फोटो शेअर करत रिलेशनशिपची कबुली दिली.

सकाळ डिजिटल टीम

Shraddha Kapoor : बॉलिवूडमधील कायम चर्चेत राहणारी श्रद्धा कपूर पुन्हा एकदा तिच्या रिलेशनशिपच्या चर्चांमुळे लाईमलाइटमध्ये आली आहे. श्रद्धाने सोशल मीडियावर ती राहुल मोदीबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली आहे. राहुल आणि श्रद्धा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा बराच काळ रंगल्या होत्या पण तिने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने अखेर लक्ष वेधून घेतलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा राहुलबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. अगदीच महिन्यभरापूर्वी ते दोघं एकत्र व्हेकेशनला गेल्याची चर्चा होती. एकाच लोकेशनवरील त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यातच श्रद्धाने केलेल्या पोस्टमुळे अखेर एकप्रकारे श्रद्धाने तिच्या रिलेशनशिपची कबुली दिली असल्याचं म्हंटलं जातंय.

श्रद्धाने सोशल मीडियावर तिचा आणि राहुलचा एक सेल्फी पोस्ट केला आणि त्याला 'दिल रख ले पर नींद तो वापस दे दे यार' असं कॅप्शन आणि हार्ट इमोजी शेअर केला आहे. यामुळे तिने तिचं रिलेशनशिप कबूल केलं असल्याचं म्हंटल जातंय. तिची ही पोस्ट व्हायरल झाली असून अनेकांनी तिचं अभिनंदन केलं.

Sharddha Kapoor & Rahul Modi

राहुल आणि श्रद्धा यांची ओळख 'तू झूठी में मक्कार' या सिनेमाच्या सेटवर झाली. राहुल हा लेखक असून आजवर त्याने बऱ्याच सिनेमांचं लेखन केलं आहे.श्रद्धा राहुलपेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे. गेला बराच काळ ते एकमेकांना डेट करत असून त्यांनी त्यांचं रिलेशन बराच काळ खाजगी ठेवलं होतं पण अखेर ते त्यांचं रिलेशनशिप अधिकृत करणार असल्याचं म्हंटल जातंय. ते सध्या तरी रिलेशनशिप मध्ये अजूनतरी त्यांनी लग्नाचा विचार केला नसल्याचं त्यांच्या जवळच्या मित्रांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त उद्धव-राज ठाकरे येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT