Sonakshi Sinha Wedding Esakal
Premier

Sonakshi Sinha Wedding : शत्रुघ्न सिन्हा यांची लेक 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात; सोनाक्षीच्या लव्हस्टोरीसाठी सलमान कारणीभूत

Sonakshi Sinha soon to get married : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sonakshi Sinha : बॉलिवूड मधील एक आघाडीची अभिनेत्री म्हणजे सोनाक्षी सिन्हा. हिरामंडी या वेब सिरीज मुळे चर्चेत आलेली सोनाक्षी लवकरच लग्नबंधनात अडकतेय. सोनाक्षी तिचा बॉयफ्रेंड झहीर इकबालशी लग्न करणार असल्याची तारीख समोर आल्याची चर्चा आहे.

सोनाक्षीचं लग्न

मिडिया रिपोर्ट्सनुसार, सोनाक्षी आणि झहीर 23 जूनला लग्न करणार असल्याचं म्हंटलं जातंय. हा विवाहसोहळा खूप खाजगी असणार असून फक्त कुटूंब आणि जवळचे मित्र-मैत्रिणी या सोहळ्याला हजेरी उपस्थित असतील अशी माहिती झूम टीव्ही या चॅनेलला सूत्रांनी दिली. मुंबईतील सोबो हॉटस्पॉट या ठिकाणी हा विवाहसोहळा पार पडणार असल्याचं म्हंटलं जातंय.

दरम्यान, या बाबत सोनाक्षी किंवा तिच्या बॉयफ्रेंडने कोणतंही अधिकृत वक्तव्य केलं नाहीये.

गेली अनेक वर्षं सोनाक्षी आणि झहीर एकमेकांना डेट करत आहेत. झहीर हा एक फिटनेस ट्रेनर असून त्याचे अभिनेता सलमान खानशी सुद्धा जवळचे संबंध आहेत. मध्यंतरी सोनाक्षी आणि झहीरला फोटोग्राफर्सनी एकत्र पाहिल होत. डिनर डेटला गेलेल्या या जोडीबरोबर झहीरची भाचीही उपस्थित होती.

सोनाक्षी-झहीरची लव्हस्टोरी

सलमान खानच्या एका पार्टीमध्ये सोनाक्षी आणि झहीरची भेट झाली होती. पुढे त्यांची मैत्री झाली आजी नन्तर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. गेले दोन वर्षं ते एकमेकांना डेट करत असून त्यांनी त्यांचं नातं लपवलं नसलं तरीही ते फार त्यावर बोलतानाही दिसत नाहीत.

सोनाक्षीचे प्रोजेक्ट्स

दरम्यान, सोनाक्षीची हिरामंडी द डायमंड बाजार ही वेबसिरीज चांगलीच गाजली. या वेबसिरीज मध्ये तिने साकारलेली फरिदन ही भूमिका सगळ्यांना आवडली. सत्तेसाठी स्वतःच्या मावशी विरुद्धच बंड पुकारणाऱ्या फरिदनने सगळ्यांची मनं जिंकली. याबरोबरच ती रेहाना या भूमिकेतही दिसली. तिच्या दुहेरी भूमिकेचं अनेकांनी कौतुक केलं.

या बरोबरच सोनाक्षी आता 'काकुडा' आणि 'निकिता रॉय अँड द बुक ऑफ डार्कनेस' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर नुकताच तिचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा सिनेमाही रिलीज झाला होता. त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Cabinet: मोदी सरकारमधील अनेक मंत्री देणार राजीनामे? देशाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? मोठी माहिती समोर

Latest Marathi News Live Update : कुर्ला-चेंबूर परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Ketan Agrawal Lohgad Case : केतन अग्रवाल प्रकरणात महत्वाची अपडेट, लोहगडावरील हत्येपूर्वीचा व्हिडिओ समोर; दोघेही रोमान्स करताना दिसले

प्रवीण तरडेंचा ‘थिएटर व्हिजिट’ पॅटर्न आता बॉलिवूडमध्ये हिट! बॉलिवूडने स्वीकारला ‘तरडे फॉर्म्युला’

West Bengal Politics: पक्षात काहीतरी मोठं शिजतंय? ममतांच्या एका निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ, अचानक उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT